Sambhaji Patil Nilangekar News : लातूर जिल्हा जलयुक्त अन् ज्ञानयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

Bjp : त्यांनी राजकारणात यशाचे शिखर गाठावे, महाराष्ट्राचं नेतृत्व करावे, अशी सदिच्छा आई म्हणून सर्वांच्या समोर करते.
Sambhaji Patil Nilangekar News
Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
Published on
Updated on

Latur : भिषण दुष्काळी स्थितीमुळे मागील काळात लातूरसाठी रेल्वेने पाणी आणावे लागले. विविध पक्षातील लोकप्रतिनीधी त्यांच्या-त्यांच्या पध्दतीने राजकारण केले. (Sambhaji Patil Nilangekar News) पावसाचे वाहून जाणारे पाणी आडवून लातूर जिल्हा जलयुक्त आणि ज्ञानयुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केला. वाढदिवसानिमित्त भव्य सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

Sambhaji Patil Nilangekar News
Abdul Sattar On Farmers: शेतकऱ्यांनो पाऊस आल्याशिवाय पेरणीची घाई नको...

आपण सर्वच राजकारण करत असतो मात्र जिल्ह्यातील अवर्षण स्थितीबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याबाबतची जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. (Sambhaji Patil Nilangekar) जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहत असल्या तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. (Latur) हे पाणी आपल्या भागात अडवून संपूर्ण जिल्हा जलयुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावरून लागाणारा निधी खेचून आणू प्रसंगी जनआंदोलन उभे करू असा इशारा निलंगेकर यांनी दिला.

लातूरला पाण्याची गरज आहे, वाहून जाणारे पाणी जोपर्यंत जोडणार नाही तोपर्यंत हा भाग सुजलम सुफलम होणार नाही. (Bjp) शिवाय लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेवून डाॅक्टर, इंजिनियर होतात. शैक्षणिक लातूर पॅटर्न हा गेल्या अनेक वर्षापासूनचा असतानाही येथे केंद्रीय विद्यापीठ नाही. त्यासाठी लातूर येथे केंद्रीय विद्यापीठ होणे गरजेचे आहे.

जलयुक्त लातूर व केंद्रीय विद्यापीठ या प्रमुख मागण्या घेऊन १५ आॅगस्टपासून कामाला लागणार आहोत. केंद्रात व राज्यामध्ये भाजपाचे सरकार आहे त्यामुळे निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असून शासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन उभे करू, याचा पुनरुच्चार देखील निलंगेकर यांनी केला. घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझा कार्यकर्ता नव्हे तर कुटूंबातील व्यक्ती आहे असे आम्ही समजतो. सर्वात मोठं व्यक्तीमत्व बनवलं, आमदार झालो, मंत्री झालो जनतेने भरपूर प्रेम दिले. मात्र ८० टक्के मुलं रोजगारासाठी बाहेर जात आहेत. मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सरकार मधला एक प्रतिनीधी म्हणून बोलतो.

जिल्ह्याची मागणी पाणी आहे. यासाठी नेटाने प्रयत्न करणार, अशी ग्वाही देखील निलंगेकर यांनी यावेळी दिली. गेल्या २४ वर्षापासून या जनतेने संभाजीला सांभाळले आहे. मी त्यांना जन्म दिला असला तरी राजकीय जन्म देणारी जनता आपण आहात. अतिशय साधेपणा सतत या भागातील मतदारांसाठी कांहीना काही केले पाहीजे, असा विकासाचा ध्यास संभाजी घेत असतात. त्यांनी राजकारणात यशाचे शिखर गाठावे, महाराष्ट्राचं नेतृत्व करावे, अशी सदिच्छा आई म्हणून सर्वांच्या समोर करते, अशा शब्दात रुपाताई निलंगेकर यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com