Loksabha Election 2024 : बोर्डीकरांची परभणी लोकसभा मोहीम या वेळी फत्ते होणार का?

Parbhani Constituency : जिंतूर विधानसभेच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव चर्चेत
Sanjay Jadhav, Meghna Bordikar
Sanjay Jadhav, Meghna BordikarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News :

परभणी जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराण्यांमध्ये बोर्डीकर परिवाराचा समावेश होतो. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर कायमच जिल्ह्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर जिंतूर विधानसभेच्या आमदार आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने दोघांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपने रामप्रसाद बोर्डीकर यांची लोकसभा निवडणूक (Loksabha Election) प्रमुखपदी नियुक्ती केली असून, मेघना बोर्डीकर यांच्यावर महायुतीच्या समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर प्रथमच परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Constituency) भाजपचा उमेदवार असेल. त्यामुळे भाजपने बूथ स्तरापर्यंत पक्षविस्तार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात प्रथम भाजपचा आमदार निवडून आला. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ राखीव प्रवर्गासाठी आरक्षित होता. भाजपचे (BJP) विठ्ठल गायकवाड या निवडणुकीत विजयी झाले होते.

Sanjay Jadhav, Meghna Bordikar
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अमित शहा फोडणार संभाजीनगरातून

त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार मोहन फड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली, पण ते पराभूत झाले. परंतु याच निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी पक्षाचा झेंडा फडकत ठेवला.

शिवसेना-भाजप युती तुटली आणि परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपला उमेदवार उभा करण्याची संधी मिळाली. 2014 आणि 2019 मध्ये विजय मिळवून तिसऱ्या वेळेस निवडणुकीच्या मैदानात उतरत असलेल्या खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी भाजपकडे मेघना बोर्डीकर हा सक्षम पर्याय असल्याचे बोलले जाते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार संजय जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा झाला होता.

या निवडणुकीतही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. जाधव यांना दोन टर्मचा अनुभव ही जमेची बाजू असली तरी अँटी इन्कम्बन्सीचा फटकाही त्यांना बसू शकतो. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रासपचे रत्नाकर गुट्टे हे सध्या महायुतीपासून लांब असले तरी त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील, अशी शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीने प्रामाणिक काम केले, तर...

माजी आमदार अजित पवार गटाचे मधुसूदन केंद्रे यांनी महायुतीच्या मेळाव्यात उपस्थित राहून भाषणही केले. त्यामुळे गंगाखेड मतदारसंघ बोर्डीकराना अनुकूल होऊ शकताे. पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन फड यांच्यावर पक्षाने विधानसभा निवडणूकप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या विविध उपक्रमांमधून ते सक्रिय आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनीही महायुतीच्या मेळाव्यात मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाला अनुकूलता दर्शवली. मात्र, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि दुर्राणी यांच्यातील दुरावा मिटवण्याचे मोठे आव्हान बोर्डीकरांसमोर आहे. परभणी विधानसभा मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या अधिक आहे.

पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा बोर्डीकरांना नक्कीच होऊ शकतो. तसेच शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचाही फायदा बोर्डीकरांना होऊ शकतो. अँटी इन्कम्बन्सी, मोदी यांची लोकप्रियता व महायुतीच्या नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यास बोर्डीकरांची लोकसभा मोहीम फत्ते होऊ शकते.

(Edited by Avinash Chandane)

R

Sanjay Jadhav, Meghna Bordikar
Ashok Chavan Resign From Congress: अशोक चव्हाणांचा राजीनामा अन् महाविकास आघाडी 'चेकमेट'?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com