Aurangabd Central Assembly Election : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिदोरी आजही आमच्या सोबत : प्रदीप जैस्वाल

Pradeep Jaiswal election campaign speech : महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत त्यांच्याकडे आशिर्वाद मागितला
Pradeep Jaiswal election campaign
Pradeep Jaiswal election campaign
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : आदरणीय साहेब आज आपला स्मृतीदिन. आपल्या विचारांच्या वाटेवर चालणारे आम्ही पाईक. हिंदुत्व आणि आपला भगवा हा अबाधित ठेवण्याच तुमचा विचार आम्ही अविरत पेलत राहु. साहेब आज तुम्ही जरी आमच्यात शरीराने नसलात तरी तुमच्या विचारांची शिदोरी आमच्या पाठीशी आहे. साहेब आम्ही लढतोय, आपल्या हिंदुत्वासाठी, आपल्या भगव्यासाठी आपले आशिर्वाद कायम असु द्या, अशा शब्दात औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत त्यांच्याकडे आशिर्वाद मागितला.

साहेब आज तुम्हाला या स्मृती दिनी विनम्र अभिवादन, आपल्या विचारांनी कायम आमच्या सोबत रहा, आशिर्वाद द्या, तुमचाच एक शिवसैनिक प्रदीप शिवनारायण जैस्वाल, अशा शब्दात जैस्वाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून शेवटचे छत्तीस तास उरले आहेत. या निमित्ताने जैस्वाल यांनी मतदारंसघात भेटीगाठी आणि पदयात्रेवर जोर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने दोन वर्षांत ६०६ कोटी रुपयांची विकासकामे मतदारसंघात करता आल्याचे ते सांगतात.

दरम्यान परिट ( धोबी ) समाजाच्या वतीने जैस्वाल यांना पाठिंबा जाहीर केला. माझ्या कामावर विश्वास ठेवून, धोबी समाजाने जो पाठिंबा जाहीर केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळात धोबी समाजाच्या प्रश्नांसाठी मी कायम कटिबद्ध आहे हा विश्वास देतो. राजकारण सुरू राहील, पण माझ्या माय-बाप जनतेसाठी काम कधीच थांबू शकत नाही.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात विकासाची गती वाढवत, मी पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली आहेत. हरसिद्धी नगर, शाक्य नगर, भीमनगर, वानखेडे नगर, हनुमान टेकडी, आणि मनपा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळील भागात पाण्याच्या टाक्या उभारण्याचे व पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी 2,740 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत, आणि कामासाठी दर्जेदार सामग्रीचा वापर केला जात आहे. लवकरच मध्य मतदारसंघ पाण्याच्या त्रासातून मुक्त होईल. हे फक्त तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या हक्काच्या माणसामुळे शक्य होत आहे, असे जैस्वाल यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com