राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कब्रस्तानात एकाने केली धक्काबुक्की

दुर्राणी (Babajan Durani) यांनी या प्रकारानंतर पाथरी पोलिस ठाण्यात मोहंमद चाऊस यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Ncp Mla Babajni Durani
Ncp Mla Babajni DuraniSarkarnama
Published on
Updated on

पाथरीः अत्यंविधीसाठी पाथरी शहरातील मुस्लिम स्मशानभूमीत आलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका इसमाने धक्काबुक्की केल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण पाथरी शहरात तणावाचे वातावरण पसरले असून बाजारपेठ बंद करण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर बाबाजानी दुर्राणी यांनी मोहमंद चाऊस या व्यक्तीविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी शहरातील नागरीक लालू कुरेशी यांच्या अंत्यसंस्कारासाठी बाबाजानी दुर्राणी हे दुपारी माळीवाडा परिसरातील जुम्मा मशीद कब्रस्थान येथे आले होते.

त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक दत्तराव मायंदळे, बखतीयार खान व जुबेर बीन हावेल यांच्याशी ते चर्चा करत असतांना अचानक तेथे आलेल्या मोहम्मद बीन सईद बीन किलेब चाऊस याने त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. दुर्राणी यांना धक्काबुक्की करत त्याने त्याना जीवे मारण्याची धमकी दिली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थितीतामध्ये एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती पाथरी शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे शहरात तणाव पसरला, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून घेतली. दरम्यान, दुर्राणी यांनी या प्रकारानंतर पाथरी पोलिस ठाण्यात मोहंमद चाऊस यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायकवाड हे करीत आहेत. दरम्यान, बाबाजानी यांच्यावर हल्ला करणारे मोहंमद चाऊस हे शहरातील शांतता भंग करत आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे मोहम्मद चाऊस यांना हद्दपार करावे, अन्यथा सोमवार २२ नोव्हेंबरपासून शहरातील सर्व व्यापारी आपली दुकाने बेमुदत बंद ठेवतील, अशा इशाऱ्याचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आरिफ खान यांनी तहसीलदार, यांना दिले आहे.

Ncp Mla Babajni Durani
मुस्लीम आरक्षणाचे बिल आणा, अन्यथा रस्त्यावर उतरू; MIMचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com