Aurangabad Congress : जे कधी गांधी भवनाची पायरीही चढले नाही त्यांनाच पदांची खैरात

मी दिल्ली येथे झालेल्या निषेध कार्यक्रमात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. त्यामुळे पायाने अधू झालो, पण मला फक्त सदस्य म्हणून कार्यकारिणीत संधी दिली. (Congress)
Congress Worker Khan, Aurangabad
Congress Worker Khan, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी जाहीर केलेल्या शहराच्या कार्यकारिणीवर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव मसरूर खान यांनी आक्षेप घेतला आहे. (Congress)ज्यांनी आयुष्यात कधीच शहागंज येथील गांधी भवनाची पायरी चढली नाही, त्यांना पदांची खैरात वाटण्यात आल्याचा आरोप खान यांनी केला आहे. (Aurangabad)

पक्षातील ज्येष्ठ, कनिष्ठ यांचा ताळमेळ बसवून नवी कार्यकारिणी जाहीर करावी, अन्यथा राजीनामा देईन, असा इशारा त्यांनी दिला. (Marathwada) नुकत्याच जाहीर झालेल्या शहर काॅंग्रेस कार्यकारणीच्या निवडीवरून पक्षात धुसफूस सुरू आहे.

शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी नुकतीच शहराची कार्यकारिणी जाहीर केली. त्यात २० उपाध्यक्ष, ४४ सरचिटणीस, ४३ सचिव, कोषाध्यक्ष, दोन प्रवक्ते, ४० सदस्य व वरिष्ठ नेत्यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. कोषाध्यक्ष म्हणून, जितेंद्र संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र संचेती यांनी कधीच गांधी भवनाची पायरी चढलेली नाही, असा आरोप खान यांनी केला. मी दिल्ली येथे झालेल्या निषेध कार्यक्रमात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. त्यामुळे पायाने अधू झालो, पण मला फक्त सदस्य म्हणून कार्यकारिणीत संधी दिली. जुन्या नव्यांचा मेळ बसवून नवी कार्यकारिणी जाहीर करावी, अन्यथा माझा राजीनामा मंजूर करावा, अशी मागणी खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

Congress Worker Khan, Aurangabad
Assembly Session : बसून बोलू नका, बाहेर लाॅबीत जा, सोळंकेंनी भाजपच्या शेलारांना झापले..

शहराची कार्यकारिणी ही प्रदेशाध्यक्षांच्या मंजुरीने निवडण्यात आली आहे. खान यांना युवक काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला आहे. नाराजी जाहीर व्यक्त न करता, पक्षाच्या शिस्तीत राहून त्यांनी काम करणे योग्य राहील, अशा शब्दात उस्मानी यांनी खान यांना सुनावले. तसेच निवडण्यात आलेल्या कार्यकारणीला राज्य पातळीवर मंजुरी मिळाली असल्याचे सांगत उस्मानी यांनी हात झटकल्याचे देखील यावरून दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com