बीडमधील माफियाराजला सत्तेतल्या लोकांचा पाठिंबा : पंकजांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता निशाणा

महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.
 Pankaja Munde
Pankaja Munde sarkarnama

बीड : जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत. खून, दरोडे, महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. जिल्ह्यातील बोकाळलेला 'माफिया राज' बंद करावा असेही त्यांनी म्हटले आहे. या माफिया राजला सत्तेत बसलेल्या लोकांचा अप्रत्यक्ष पाठींबा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. (Pankaja Munde alleges illegal trade has increased in Beed district)

 Pankaja Munde
राज ठाकरेंचा निर्णय; रूपाली पाटील पुण्याच्या जबाबदारीतून मुक्त

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेती पिकांचे तसेच शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. जीवित व वित्त हानी मोठया प्रमाणावर झाली आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यात अतिवृष्टीने साडेपाच लाख हेक्टरांवरील पिकांना फटका बसला असून सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, बाजरी आदी पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात पिकांचेच नाही तर शेत जमिनीची माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवीतहानीही मोठ्या प्रमाणावर झाली असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे तर साडेचारशेंच्या आसपास जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

 Pankaja Munde
भंगाराचा व्यवसाय करता करता मलिकांनी आपली मतीही भंगरात विकली!

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यातच पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी असे दोन्ही संकट एकाचवेळी आली आहेत. शासनाने अशा कठीण समयी त्यांच्या पाठिशी उभे रहावे आणि दस-यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. तसेच, जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडे, मारामारी याबरोबरच महिलांवरील अत्याचार, जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतूक आदींनी डोके वर काढले आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असून त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नाही. सत्तेत बसलेल्या लोकांचा याला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याने सर्व सामान्य जनता त्रासली आहे. हा 'माफिया राज' बंद करावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com