३२ नंबरच्या मंत्रिपदावरुन पंकजांनी धनंजय मुंडेंना पुन्हा डिवचले! म्हणाल्या...

पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.
Dhananjay Munde, Pankaja Munde
Dhananjay Munde, Pankaja MundeSarkarnama

बीड : भाषण करताना मी म्हणाले होते बीड जिल्याला पहिल्या ४ मधील मंत्रीपदाची सवय आहे. तुमचा नंबर 32 वा आहे. जे आहे ते बोललो. आम्ही काही खिजवले नाही. मी 32 वा नंबर म्हणाले होते. मी औकात काढली नाही. तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून पहा. औकात मी म्हणाले नाही. हे म्हणतात, आमची औकात काढली, आमचे मंत्रीपद काढले. तुम्हीच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप करत भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड जिल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.

Dhananjay Munde, Pankaja Munde
भाजपमध्ये नाराज आहात का?, या प्रश्नावर पंकजा मुंडेंचे सुचक स्मीत!

केज नगरपंचायत इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. मी 32 नंबरचे मंत्रीपद म्हणाले होते. यात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान काय, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला. बीड जिल्यात नगरपंचायतचा जो निकाल लागला तो कार्यकर्त्यांचा आहे, असेही त्या म्हणाला.

लोकांनी निवडून देताना कोण काम करणार आहे ते पाहिले पाहिजे. बीडच्या पालकमंत्र्यांनी कधीच निधीसाठी कोणापूढे हात पसरला नाही. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला निधी वाटला. बीडचे कार्यकर्ते सांगत असत या जिल्ह्याला निधी द्या त्या जिल्ह्याला निधी द्या. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना सुद्धा निधी दिला आहे. असे सांगत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावाला. मी माझ्या कामात कधीच भेदभाव केला नाही. मात्र, आत्ताचे पालकमंत्री भेदभाव करतात, असा आरोपही त्यांनी केला. टोल स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही द्यावा लागतो. इतर कार्यकर्त्यांना ही द्यावा लागतो असे म्हणत पंकजा मुंडे आक्रमक झाल्या होत्या.

Dhananjay Munde, Pankaja Munde
काँग्रेस पुन्हा घालणार फडणवीस अन् चंद्रकांतदादांना साकडे

प्रकरण काय?

केज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले होते की, सर्वोत्कृष्ट मंत्र्यांच्या यादीत धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद 32 व्या क्रमांकावर आहे. मी मंत्री असताना पहिल्या चार मंत्र्यांमध्ये माझे नाव होते. 32 व्या नंबरपर्यंत आम्ही कधीही घसरलो नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली होती. मात्र याला प्रत्युत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले होते, पंकजा यांनी माझी औकात काढली. माझे मंत्रीपद काढले. हा माझा नव्हे तर माझ्या खात्याचा सामाजिक न्याय विभागाचा आणि पर्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com