Pankaja Munde
Pankaja Munde

Pankaja Munde मी हात जोडून विनंंती करते...; नाराजीच्या चर्चेवर पंकजा मुंडे अक्षरश: वैतागल्या

Pankaja Munde| मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा सुरु आहे.

परळी : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप लांबल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. त्यातच राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना मंत्रिपद मिळावे, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र पंकजा मुंडे यांनी स्वत: खुलासा केला आहे.

परळीमध्ये आयोजित तिरंगा रॅलीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. “ मी हात जोडून विनंती करते की, उगीचच नाराज नाराज म्हणू नका. मी नाराज आहे असं काहीही नाही. पण माझे कार्यकर्ते नाराज आहेत हे खरं. त्यांनीही ती नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. त्यांना दु:ख वाटत असेल पण मी त्यांना मी शांत केलं आहे.”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. पण आज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं त्याचा नेता मोठा व्हावा. आपल्या नेत्याला काही मिळालं नाही तर कार्यकर्ते नाराज होतात. त्यात नाराजी कसली, ती लोकांची अपेक्षा असते. माझ्या राजकीय जीवनात एक अपघात झाला होता, त्या अपघातामुळे लोकांना वाटंत ताईला ताकद दिली पाहिजे. त्यामुळे लोकांना वाटतं त्यात नाराजी कशी असेल. त्यांच समाधान करायची जेवढी माझ्यात शक्ती आहे तेवढं मी त्यांचं समाधान करत असते, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Pankaja Munde
एकनाथ शिंदेंनी कामाला लागावं, पुजा-अर्चा करण्यासाठी वेगळा मंत्री नेमावा- जयंत पाटील

तसेच, "मी कायम संघर्ष करत आले आहे. मंत्री असतानाही मी सुद्धा खूप संघर्ष केला. अनेक आरोपांना सामोरे गेले. संघर्षांना सामोरे गेले. मंत्री असताना माझा एक दिवस सुखाचा बघितला का तुम्ही? असही त्यांनी विचारल. पण हा संघर्ष कुठल्या व्यक्तीविरोधात नाही, तर प्रवृत्तीविरुद्ध आहे. हा माझा संघर्ष सुरूच राहणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील या सत्तास्थापनेत माझा सिंहांचाच काय, उंदराचाच काय तर मुंगीचाही वाटा नाही. मी त्याबद्दल पुर्णपणे अनभिज्ञ होते. राज्यात सत्ता स्थापन झाल्याचा आनंद आहे, पण माझा त्यात काही रोल असं खोटं श्रेय मी घेणार नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांंना स्थान देतील अशी माझी त्यांच्याकडे सक्त मागणी आहे. अशी मिश्लिक टिपण्णीही यावेळी पंकजा मुंंडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com