कान किटलेत म्हणणाऱ्या पंकजा मुंडे इम्पेरिकल डाटावर भरभरून बोलल्या

(OBCs must fight this together, said pankaja Munde)ओबीसींनी एकत्रपणे या विरोधात लढा दिला पाहिजे, असे झाले तरच ओबोसींची आरक्षण आपण पुन्हा मिळवू शकू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

मुंबई ः ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारने अद्यादेश काढला असला तरी त्यावर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वेळकाढूपणा केला, तारखा वर तारखा घेतल्या त्यामुळे ओबीसींचे आरक्षण गेले. इम्पेरिकल टाटा आणि जनगणना यातील फरक या सरकारने समजून घेतला पाहिजे, असा टोला लगावत आधी इम्पेरिकल डाटा, इम्पेरिकल डाटा ऐकून माझे कान आता किटलेत असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे आज मात्र त्यावर भरभरून बोलल्या.

ओबीसी जनगणना आणि इम्पेरिकल डाटा हे दोन वेगळे विषय आहेत. हे समजून घ्या, असे सांगत पंकजा मुंडे यांनी त्याची व्याख्याच पत्रकार परिषदेत सांगितली. मुंबई येथे महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या काळ्या कारकीर्दी संदर्भात पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पंकजा मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, इम्पेरिकल डाटा हा पुर्णतः राज्य सरकारचा विषय आहे. पण केंद्राकडे बोट दाखवत केंद्र सरकारच आम्हाला इम्पेरिकल डाटा देत नाही, अशा प्रकारची दिशाभूल महाविकास आघाडी सरकारने केली. मागसवर्ग आयोगाची स्थापना करून त्यांच्याकडून हा इम्पेरिकल डाटा गोळा करणे सहज शक्य होते. पण या सरकारने दोन वर्ष वेळ घालवला, मागासवर्ग आयोगाला सरकार निधी देत नाही, त्यामुळे यांना ओबीसींचे आरक्षण टिकावायचे की नाही? असा प्रश्न पडतो.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यभरात जो आक्रोश, आंदोनले झाली, समाज रस्त्यावर उतरला त्या दबावामुळेच सरकारने अद्यादेश काढला. पण त्या विरोधात देखील औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाला आधीन राहून हा अद्यादेश लागू होणार आहे. त्यामुळे ओबीसी राजकारण्यांवर कायम टांगती तलवार असणार आहे. ही टांगती तलवार नाहीसी होऊन ओबीसींचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Pankaja Munde
गिरीश महाजन म्हणतात, दंगलींना राज्य सरकारचे समर्थन!

पण केंद्राकडे बोट दाखवून महाविकास आघाडीचे नेते पळ काढत आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात राज्यातील ८५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, तर यामुळे समाजाचे मोठे राजकीय नुकसान होईल. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून ओबीसींनी एकत्रपणे या विरोधात लढा दिला पाहिजे, असे झाले तरच ओबोसींची आरक्षण आपण पुन्हा मिळवू शकू, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

काही महिन्यांपुर्वी औरंगाबादेत झालेल्या ओबीसी जागर अभियान मेळाव्यात बोलतांना इम्पेरिकल डाटा, इम्पेरिकल डाटा हे ऐकून आता माझे कान किट्ट झाले आहेत. जर दुसऱ्या राज्यांनी काय केले? याचा अभ्यास करा, भाजपची सत्ता असलेल्या नाही तर इतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांकडून माहिती घ्या, असा टोला पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला होता. त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत मात्र इम्पेरिकल डाटा जमा करण्यात महाविकास आघाडी सरकार कसे अपयशी ठरले हे पंकजा यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com