Maharashtra Assembly Election 2024 : महायुती सरकारने जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत. तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे 370 हेक्टरवर औद्योगिक वसाहत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन औद्योगिक वसाहती होणार आहेत.
तामलवाडी येथे दीडशे उद्योजक येणार असून त्यांच्या यापूर्वीच बैठका झाल्या आहेत. एमआयडीसीच्या माध्यमातून 12 हजार कामगारांना रोजगार मिळेल. तसेच होरटी येथे सौर उर्जा प्रकल्प होणार आहेत. तेथेही रोजगार निर्मिती होणार आहे. अर्थकारणास चालना मिळेल, असा महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजीतसिंह पाटील (MLA Rana Jagjeetsinh Patil) यांनी केला.
तुळजापूर तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी काही खासगी तसेच काही सरकारी जमिनी आहेत. सदर जमिनीसाठी मोजणी तसेच अन्य कामे चालू झालेली आहेत असेही राणा पाटील यांनी यावेळी सांगितले. महायुतीच्या वतीने विकासावर बोलू या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात राणा पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.
तामलवाडी येथे साधारणपणे एक छोटा कारखाना पाच कोटी रूपयांपर्यंत होणार आहे. वस्त्रोद्योग असणारे अनेक उद्योजक येथे येण्यास उत्सुक असल्याचे ते म्हणाले. (BJP) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव गोकुळ शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी, भाजपचे शहराध्यक्ष शांताराम पेंदे, तुळजापूर बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील उपस्थितीत होते.
जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष नारायण नन्नवरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, शिवसेनेचे शहरप्रमुख बापुसाहेब भोसले, गुलचंद व्यवहारे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, नरसिंग बोधले, राहुल पाटील सास्तुरकर, नरेश अमृतराव, आनंद कंदले, नागेश नाईक, बाळासाहेब शामराज, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक उमेश गवते आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.