Raosaheb Danve : मी पण लवकरच राज ठाकरेंना भेटणार...

राज ठाकरे आणि भाजपची युती त्यांनी आपली परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलल्याशिवाय शक्यच नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Raj Thackearay
Raosaheb Danve-Raj ThackearaySarkarnama

दिल्ली : गुडीपाडव्याच्या शिवाजी पार्कवरील मैदानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackearay) यांनी केलेल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपला पूरक अशी भूमिका घेत ठाकरे यांनी शिवसेना,उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली होती. (Bjp) ही सभा आणि त्याची चर्चा राज्य आणि देशभरात सुरू असतांना काल केंद्रातील मोठे नेते व मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या नव्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांनाही उधाण आले. आता गडकरी-ठाकरेंच्या भेटीची चर्चा थांबत नाही तोच केंद्रातील आणखी एक भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे देखील राज ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहेत. लोकसभा अधिवेशन संपल्यानंतर ही भेट होणार असल्याचे दानवे यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

मनसे-भाजप युती होणार का? यावर जोपर्यंत राज ठाकरे हे आपली परप्रांतीयाबद्दलची भूमिका बदलत नाही, तोपर्यंत मनसेशी युती शक्य नसल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांची गुडी पाडव्याची सभा, गडकरी यांनी घेतलेली त्यांची भेट या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी देखील आपण राज ठाकरेंची भेट घेणार आहोत हे सांगून आणखी एक धक्का दिला आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज ठाकरे व त्यांच्या पक्षाविषयी सविस्तर भूमिका मांडली. दानवे म्हणाले, राज ठाकरे यांनी आपला मोर्चा पुन्हा हिंदुत्वाकडे वळवल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. शिवाय शिवसेनेने हिंदुत्व सोडले हे जे आम्ही बोलत होतो, तेच राज ठाकरे आपल्या भाषणातून म्हणाले.

Raosaheb Danve-Raj Thackearay
Imtiaz Jalil : शहरातील उड्डाणपूल, पैठण, शिर्डी रस्त्याच्या कामाला गती द्या..

म्हणजेच आता शिवसेनेला घरातूनच हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. राज ठाकरे आणि भाजपची युती त्यांनी आपली परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलल्याशिवाय शक्यच नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली ती वैयक्तिक होती हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मी देखील राज ठाकरे यांची अधिवेशन झाल्यानंतर भेट घेणार आहे, पण ती राजकीय नसून वेगळ्या कामासाठी असणार आहे, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com