Builder Sanjay Biyani murder case news,
Builder Sanjay Biyani murder case news, Sarkarnama

खळबळजनक : जमिनीच्या वादाचा बदला म्हणून थेट बियाणींच्या हत्येत आरोपी करण्याचा प्लॅन

Builder Sanjay Biyani | Nanded : संजय बियाणी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

नांदेड : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या बिल्डर संयज बियाणी (Builder Sanjay Biyani murder) यांच्या हत्येला ९ दिवस उलटल्यानंतरही मारेकऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना (Nanded Police) अद्याप यश आलेले नाही. पण राज्याच्या गृहमंत्रालय (Home Minister) या हत्येच्या तपासावर नियमीत लक्ष ठेवून असल्याने नांदेड पोलिस सध्या दिवस-रात्र चक्र हलवून वेगाने तपास करत आहेत. मात्र अशातच बियाणी यांच्या घरी आलेल्या एका धमकीच्या पत्राने नांदेड पोलिसांची झोप उडवली होती. मात्र तपासाअंती हे पत्र बोगस असल्याचे समोर आले असून या पत्राचा आणि गुन्ह्याचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Builder Sanjay Biyani murder case news)

याबाबत अधिक माहिती अशी की, दोन ते तीन दिवसांपूर्वी परभणीहून एक धमकीचे निनावी पत्र बिल्डर बियाणी यांच्या घरी येवून धडकले. आधीच मारेकऱ्याच्या शोधाचे आव्हान आणि त्यात पुढे आलेल्या या पत्रामुळे नांदेड पोलिसांची शब्दशः झोप उडाली. यानंतर पोलिसांनी या पत्राचा आणि हत्येचा काही संबंध आहे का? या दृष्टीने तपासाची सुरुवात केली. पण तपासाअंती शेतीच्या वादातून एका ७४ वर्षाच्या वृध्दाने पत्र बियाणींच्या घरी पाठवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Builder Sanjay Biyani murder case news,
संतोष पाटलांच्या आत्महत्येनंतर भाजपच्या अडचणी वाढल्या; कंत्राटदारांचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

धर्माबाद तालुक्यातील आटाळा येथील विठ्ठल सुर्यवंशी यांचा पांडुरंग येवले यांच्या सोबत शेतीचा वाद आहे. त्यामुळे पांडुरंगाला या प्रकरणात अडकवायचे असे ठरवून विठ्ठल सुर्यवंशी यांनी परभणी येथे जाऊन स्पीड पोस्टने धमकीचे पत्र बियाणींच्या घरी पाठवले. मात्र पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत निनावी पत्र पाठवणाऱ्या विठ्ठल सुर्यवंशी याला अटक केली आहे. सुर्यवंशी यांनीही शेतीच्या वादातून निनावी पत्र पाठवले असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता निनावी पत्राद्वारे बियाणींच्या हत्येचे कनेक्शन परभणीला जोडले जात होते त्यावर पडदा पडला आहे. पोलिस आता पुन्हा मुख्य मारेकऱ्याच्या शोधात लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com