Bjp : नाव बदलण्याने विकास होत नाही म्हणता, मग विजयचा बाळासाहेब कसा झाला?

थोरातांचे स्टेटमेंट मी वाचले, मग मला असा प्रश्न पडला? की त्यांनी स्वत:चे नाव का बदलले? (Sudhir Mungantiwar)
Sudhir Mungantiwar-Balasaheb Thorat
Sudhir Mungantiwar-Balasaheb ThoratSarkarnama

औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औंरगाबाद शहराला देण्यास काॅंग्रेसने विरोध दर्शवला होता. या संदर्भात बाळासाहेब थोरात यांचे स्टेटमेंट मी वाचले होते. (Bjp) नाव बदलल्याने शहराचा विकास होत असतो का? असं ते म्हणाले होते. मग बाळासाहेब तुम्ही तुमचे नाव का बदलले? विजय भाऊराव थोरातांचा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) कसा झाला? असा सवाल भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत केला.

औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देत संभाजीनगर करायची चर्चा सुरू झाली तेव्हा औरंगाबादेतच बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी काॅंग्रेसची भूमिका विचारली होती. यावर उत्तर देतांना संभाजीनगरचा मुद्दा हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाहीये. शिवाय शहरांची नावे बदलून सर्वसामान्यांचा विकास होत नसतो, असे थोरात म्हणाले होते.

आज सभागृहात मुनगंटीवार यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची मागणी केली. तेव्हा थोरात यांच्या त्या विधानाची आठवण करुन दिली. मुनगंटीवार म्हणाले, नाव बदलल्याने सर्वसामान्यांचा विकास होतो का? हे थोरातांचे स्टेटमेंट मी वाचले, मग मला असा प्रश्न पडला? की त्यांनी स्वत:चे नाव का बदलले? विजय भाऊराव थोरातचे ते बाळासाहेब थोरात कसे झाले?

छत्रपती संभाजी महाराज हे धर्मासाठी जीव देणारे धर्माभीमानी होते, औरंगजेबाने त्यांना सत्तेचे आमिष दाखवले पण ते लाचार नव्हते. त्यांनी सत्ता लाथाडली आणि जीव गेला तरी धर्म सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर चाळीस दिवस संभाजी महाराजांना हालहाल करून मारण्यात आले. आज त्यांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी तरी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याला मान्यता द्या.

Sudhir Mungantiwar-Balasaheb Thorat
औरंगाबादचे संभाजीनगर करा, खड्यात गेली आमदारकी, पक्ष अन् धोरण ; सेनेला आव्हान..

खड्यात गेली आमदारकी, पक्ष आणि धोरणं या विषयावर आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेला आव्हान दिले. विधीमंडळात काल अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणावरून शिवसेनेला सुनावले होते. दोन ओळीचा ठराव तुम्हाल सभागृहात मांडता येत नाही का? असा टोला लगावला होता. त्यानंतर आज याच मुद्यावरून मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि काॅंग्रेसला सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com