Smriti Irani News : औरंगाबाद नव्हे, आता छत्रपती संभाजीनगर म्हणायची सवय करा..

G-20 : एका स्टॉलवर त्यांना माहिती देताना औरंगाबाद असा उल्लेख केला गेला.
Central Minister Smriti Irani News, Sambhajinagar
Central Minister Smriti Irani News, SambhajinagarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद नव्हे आता शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे, संभाजीनगर म्हणायची सवय करा, असा सल्ला केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सोमवारी (ता. २७) दिला. महिला-२० परिषदेच्यानिमित्ताने हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे बचतगट व स्थानिक उद्योजकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले.

Central Minister Smriti Irani News, Sambhajinagar
Mla Santosh Bangar News : बांगर शेलारांच्या पाया पडले, ठाकरे गट म्हणतो आता हेच करा ..

यावेळी एका स्टॉलवर त्यांना माहिती देताना औरंगाबाद (Aurangabad) असा उल्लेख केला गेला. यावर इराणी यांनी आता छत्रपती संभाजीनगर म्हणण्याची सवय लावा, असा सल्ला दिला.(Bjp) शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले असले तरी अनेकांच्या ते अंगवळणी पडलेले नाही. काही मान्यवरांनी आपल्या भाषणात औरंगाबाद असाच उल्लेख केला.

या प्रदर्शनात शहरातील विविध बचत गट व उद्योगांचे २० स्टॉल लावण्यात आले होते. बचत गटांच्या स्टॉलमध्ये महाराष्ट्रातील सणांची माहिती देण्यासाठी गौरी गणपतीचा देखावा तयार करण्यात आला होता. जगभरातून आलेल्या महिलांनी उत्सुकतेने याबाबत माहिती घेतली.

बचतगटांनी तयार केलेल्या कुरडया, खारोड्यांची चव महिलांनी घेत आनंद व्यक्त केल्या. स्मृती इराणी यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत माहिती जाणून घेतली. काही स्टॉलधारकांना वस्तू दिल्लीला पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जी-२० परिषदेचे शेरपा अमिताभ कांत, महिला जी-२० परिषदेच्या डॉ. संध्या पुरेचा यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com