Maratha Reservation : काळे झेंडे, घोषणाबाजीमुळे अशोक चव्हाणांना शहराबाहेर नेण्याची वेळे..

Ashok Chavan News : मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवले.
Ashok Chavan News
Ashok Chavan NewsSarkarnama

Nanded Political News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाचे पडसाद मराठवाड्यात अजूनही उमटत आहे. (Maratha Protest News) आंदोलनाचे हे लोण ग्रामीण भागात पोहचले असून ठिकठिकाणी निषेध, निदर्शने, आंदोलन करत मराठा नेत्यांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. माजीमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहिलेल्या अशोक चव्हाण यांच्याविरोधात धर्माबादमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

Ashok Chavan News
Pankaja Munde Banner : मराठा आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप ; पंकजा मुंडेंचा निषेध..

एका कार्यक्रमासाठी चव्हाण आले असता तिथेच त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. (Maratha Reservation) धर्माबाद येथील माहेश्वरी भवनमध्ये दुपारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. दरम्यान, गेटच्या बाहेर मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत चव्हाण यांना काळे झेंडे दाखवले. (Ashok Chavan) चव्हाण यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धर्माबाद येथील तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने आज सकाळपासून साखळी उपोषण सुरू होते. (Nanded) चव्हाण हे धर्माबाद येथे सकाळी अकरा वाजता आले. धर्माबाद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर दुपारी माहेश्वरी भवन येथील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली.

याची माहिती मिळताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत गेटसमोर येऊन चव्हाण यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. वातावरण चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी चव्हाण यांना शहराबाहेर नेले. दरम्यान, काहीजण चव्हाण यांच्या गाडीमागे धावत गेले आणि घोषणाबाजी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com