Osmanabad-Kalamb Assembly Constituency : कैलास पाटील यांना साथ द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

कैलास पाटील यांना साथ द्या, त्यांना विजयी करा. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
uddhav thackeray political campaign for kalas patil Osmanabad-Kalamb Assembly 2024 politics
uddhav thackeray political campaign for kalas patil Osmanabad-Kalamb Assembly 2024 politics
Published on
Updated on

धाराशीव : कैलास पाटील यांना साथ द्या, त्यांना विजयी करा. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. उस्मानाबाद मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांची येथील कन्या प्रशालेच्या मैदानात सभा झाली.

यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली. यावेळी वाशी बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत चेडे, वाशीचे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, कळंबचे माजी नगराध्यक्ष, संजय मुंदडा, माजी नगरसेवक लक्ष्मण कापसे, अॅड. मनोज चोंदे, अॅड. मंदार मुळीक, सागर मुंडे, यांच्यासह शिंदे गटातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, ठाकरे मुख्यमंत्री असताना धाराशिवचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांनी मंजूर केले. तेरणा, मांजरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रुपांतर बॅरेजसमध्ये करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. सत्ताबदलानंतर मात्र शिंदे सरकारने त्यास स्थगिती दिली. आता महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्यात येईल.

कैलास पाटील म्हणाले, शिवसैनिकांनी दिवस-रात्र काम करून मला निवडून दिले. सत्ता असेल वा नसेल, तुमची साथ सोडणार नाही. शिंदे सरकारने कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला कार्यारंभ आदेश द्यायला आठ महिने लावले. तेरणा-मांजरा नदीवरील बॅरेजसच्या कामाला स्थगिती दिली. तडवळे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची फाईल वर्ष होऊन गेले तरी मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे.

त्यावर सही करायला त्यांना वेळ नाही. जिल्ह्यात सगळीकडे बस दिल्या मात्र कळंबला दिल्या नाहीत. शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतीमालाला भाव दिला जात नाही. दुधालाही दर नाही. हे सरकार फक्त व्यापाऱ्यांचे आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अंतरवाली सराटीत लाठी हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले, याचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी विनंती यावेळी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com