Dhnanjay Munde: अजितदादा बीडला निधी देतांना ओंजळ मोठी करा, झुकते माप द्या..

बीड जिल्हा शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विकासाच्या पाऊलखुणा असलेल्या पुणे जिल्ह्याप्रमाणे विकसित व्हावा, हे आपले स्वप्न. (Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde news Updates
Dhnanjay Munde news UpdatesSarkarnama

बीड : बीड जिल्हा हा मागासलेला म्हणून ओळखला जातो, हे मागासलेपण दूर करण्यासाठी रखडलेल्या नगर- बीड- परळी रेल्वे मार्गासह, ऊसतोड कामगारांची आर्थिक उन्नती, (Beed) शेतीला मुबलक पाणी, ग्रामीण भागातील दळण वळण अशी अनेक विधायक कामे पूर्ण करण्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे. (Ajit Pawar)

कोविड काळात राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा व विकासाला पूरक निधी उपलब्ध करुन दिला. आता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात येत असलेल्या निधीतून दर्जेदार व राजकारण विरहित कामे करून दाखवू, असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी व्यक्त केला. (Dhnanjay Munde news Updates)

बीड जिल्हा शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या विकासाच्या पाऊलखुणा असलेल्या पुणे जिल्ह्याप्रमाणे विकसित व्हावा, हे आपले स्वप्न असून, यासाठी अर्थमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याला निधी देताना ओंजळ मोठी करावी व जिल्ह्याला झुकते माप द्यावे, अशी विनंतीही मुंडे यांनी केली.

जिल्ह्यातील शंभर कोटीहून अधिक विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आॅनलाईन हजेरी लावली. यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी जिल्ह्याला झुकते माप देण्याची विनती केली.

Dhnanjay Munde news Updates
Ajit Pawar:रेल्वे मार्गासह जिल्ह्यातील विकासाचा गाडा थांबणार नाही, सरकार पाठीशी

मुंडे म्हणाले, मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील कामकाज, कोविड व्यवस्थापन व जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकासकामांत आपण चांगली कामगिरी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com