Ncp : हर हर महादेव, जयंत पाटील सहकुटुंब केदारनाथ, बद्रीनाथाच्या चरणी..

विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. (Jayant Patil, Ncp)
Ncp Leader Jayant Patil and Family at Kedarnath Temple
Ncp Leader Jayant Patil and Family at Kedarnath TempleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेतले. (Ncp) राज्याला विकासाच्या दिशेने नेऊन जनतेला सुखसमृद्धी लाभू दे, असे साकडे त्यांनी महादेवाला घातले.

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतः केदारनाथ, बद्रीनाथ येथील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करत आपल्या देवदर्शनाचा अनुभव सांगितला. करत मंत्री जयंतराव पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Maharashtra) जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये हर हर महादेव, संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतल्याचे म्हटले आहे.

विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या देवदर्शन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची चढाओढ चालली आहे. अशात कोणताही गाजावाजा न करता जयंत पाटील यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराला भेट दिली.

Ncp Leader Jayant Patil and Family at Kedarnath Temple
Nanded : आमच्या मतांची गरज असेल तर संपर्क साधा , ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाला, पण मनसेचे पदाधिकारी रामाचे दर्शन घेऊन आले. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा रद्द झाला होता, पण आता नव्याने ते १५ जूनला जाणार असल्याचे समजते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील अयोध्या दौऱ्याचे नियोजन आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते देवपुजेला लागल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com