सांगली : महायुती सरकारने मातंग समाजासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी रुपयांची तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठीही मदत दिली. बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करून मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला, असे प्रतिपादन मातंग समाजाचे अभिमन्यू भोसले यांनी केले.
सांगली मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी मातंग समाजाची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना मातंग समाजाने पाठिंबा जाहीर केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ उपस्थित होते.
भोसले म्हणाले, विधान परिषदेवर मातंग समाजाच्या अमित गोरखे यांची निवड महायुतीने केली. जेजुरी येथील श्री खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षपदी मातंग समाजाचे अनिल सौंदडे यांची निवड झाली.
सांगली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र असे नाव देऊन मातंग समाजाचा गौरव केला. महायुतीने केलेल्या या कामांची दखल घेऊन सांगलीतून सुधीर गाडगीळ तसेच जिल्ह्यातून महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.
या बैठकीस श्री. दादा महाराज, माजी नगरसेविका श्रीमती अप्सरा वायदंडे, स्नेहा जगताप, ॲड. अमोल बोळाज, अभिजित तिवडे, प्रकाश आवळे, पप्पू वायदंडे, चंद्रकांत आवळे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.