भावाच्या अपघातानंतर गोपीचंद पडळकर सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना

कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना अपघात झाला आहे.
Gopichand Padlakar brother's Accident
Gopichand Padlakar brother's AccidentSarkarnama

सांगली : कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मोटारीला आज (ता. १० एप्रिल) अपघात झाला. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले असून विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची बातमी कळताच आमदार पडळकर हे सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहेत. (After brother's accident, Gopichand Padalkar left Satara tour and goes for Vita)

Gopichand Padlakar brother's Accident
राज्यात राष्ट्रपती राजवट ही भाजपची अधिकृत मागणी नाही : फडणवीसांनी केलं स्पष्ट

ब्रह्मानंद पडळकर हे एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात होते. त्यावेळी विटा-कुंडल रस्त्यावर टेंपो आणि पडळकर यांच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. त्यात ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह त्यांच्या गाडीचे चालक आणि इतर एक तिघे जखमी झाले आहेत. अपघतानंतर स्थानिक नागरिकांनी पडळकर यांना तातडीने विट्याच्या जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील जखमींमध्ये टेंपो चालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर विटा-कुंडल रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Gopichand Padlakar brother's Accident
सतेज पाटील भावूक : "कसबा-बावडाकरांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं"

दरम्यान, गोपीचंद पडळकर हे आज सातारा दौऱ्यावर होते. त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी आपला सातारा दौरा स्थगित करत विट्याकडे रवाना झाले आहेत. जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. पडळकर हेही साताऱ्याहून थेट विट्यातील रुग्णालयाकडे निघाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com