अण्णा हजारेंनी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिला हा कानमंत्र...

महाराष्ट्र ( Maharashtra ) राज्य परिवहन महामंडळातील ( ST ) कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करून घेण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
एसटी कर्मचारी अण्णा हजारेंना निवेदन देताना
एसटी कर्मचारी अण्णा हजारेंना निवेदन देतानासरकारनामा

राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत विलिनीकरण करून घेण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. Anna Hazare gave this mantra to the agitating ST employees ...

राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातील अनेक बस डेपोचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. बसस्थानक परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय. एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नसल्याने पारनेर येथील एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेत आपल्या समस्या हजारे यांच्या जवळ मांडल्या.

एसटी कर्मचारी अण्णा हजारेंना निवेदन देताना
एसटी संप : निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा २ हजार पार!

यावेळी आबा भोंडवे, सचिन थोरात, सुरेश औटी, गणेश चौधरी, मच्छिंद्र शिंदे, संदिप शिंदे, बापू शिंदे, अरुण मोकाते, नितीन सुरवसे, स्वरूपा वैद्य, कल्पना नगरे, सविता शिंदे आदींनी हजारे यांची भेट घेतली.

या प्रसंगी अण्णा हजारे म्हणाले, कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते आंदोलनांच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार केल्यास त्याला घाबरून सरकार जनतेच्या मागण्या मान्य करते. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येत राज्य सरकारवर दबावशक्ती निर्माण करावी, असा कानमंत्रच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिला.

एसटी कर्मचारी अण्णा हजारेंना निवेदन देताना
एसटी कर्मचारी आक्रमक, आम्हाला फासावर लटकवले तरी आता माघार नाही

हजारे पुढे म्हणाले की, एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करेन तसेच त्यांना पत्र पाठवून देण्याबाबतचे आश्वासन यावेळी त्यांनी आंदोलकांना दिले. मागील 17 दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरु राहू द्या. आंदोलन करत असताना कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी सर्व आंदोलकांनी घेतली पाहिजे. त्याबरोबरच आपल्याकडून सार्वजनिक मालमत्तेचे जतनही झाले पाहिजे असा सल्लाही अण्णांनी यावेळी आंदोलकांना दिला.

एसटी कर्मचारी अण्णा हजारेंना निवेदन देताना
मी परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे... मी एसटी संप चिघळू दिला नसता!

आंदोलनकर्ते व सरकार हे कुणीही वेगळे नाहीत सर्वजण आपण एकच आहोत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा विचार करायला पाहिजे. 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकारचे डोके जर ठिकाणावर येत नसेल तर लाखो लोकांनी एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजे तरच सरकारचे तोंड उघडेल व आपल्या मागण्या मान्य होतील.

- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com