महाविकास आघाडी सरकारचे नेते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहेत काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrkant Patil ) यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama

पुणे - राज्यातील विविध प्रश्नांवर भाजपकडून महाविकास आघाडीवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी कसा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrkant Patil ) यांनी आज महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. Are the leaders of the Mahavikas Aghadi government just to sit on chairs?

भाजपतर्फे पुण्यात कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या वेगळ्या हेल्पलाईनचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक व आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते.

Chandrakant Patil
Video: ..तर राज्यच केंद्र सरकारला चालवायला द्या, चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका

चंद्रकांत पाटील म्हणाले, जीएसटीसाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. प्रत्येक जबाबदारी केंद्रानेच असेल तर राज्य सरकार चालविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या, असे टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला.

ते पुढे म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला. त्यावेळी कर संकलनात तूट आली तर ती भरून देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने सर्व राज्यांना पाच वर्षांसाठी दिले होते. कोरोनाच्या काळात कर संकलन कमालीचे घटले तरीही केंद्र सरकारने वचन पाळले आहे. जीएसटी कॉन्सिलला मदत करून राज्यांना भरपाई देण्यात येत आहे. आता जूनमध्ये पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही केंद्राने राज्याला निधी देत रहावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारने पीपीई किट, मास्क, व्हॅक्सिन अशा सर्व गोष्टी केंद्रानेच द्याव्यात अशी मागणी केली. जीएसटी संकलनातील राज्याचा वाटा दररोज आपोआप मिळत असतानाही केंद्राने पुढेही जबाबदारी घ्यावी अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणतात; शरद पवारांना आता मुख्यमंत्री होण्याची घाई

पेट्रोल डिझेलवरील कर केंद्राने कमी केला तरी राज्य सरकार तो कमी करत नाही. प्रत्येक जबाबदारी केंद्र सरकारनेच पार पाडायची असेल तर महाविकास आघाडी सरकारचे नेते फक्त खुर्चीवर बसण्यासाठी आहेत काय ? मग राज्य चालवायची जबाबदारीही केंद्र सरकारकडेच द्या, असे त्यांनी सांगितले.

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत असे भाजपचेही मत आहे. तथापि, महाविकास आघाडी सरकार सभागृहाच्या कालमर्यादेबाबत घटनात्मक तरतुदींकडे दुर्लक्ष करून काम करत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत ठोस काहीही न करता या सरकारकडून फसवणूक चालू आहे. सर्वोच्च न्यायालयात या विषयावर 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

Chandrakant Patil
Video: नाना पटोलेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे - देवेंद्र फडणवीस

ते म्हणाले की, भाजप बुथपातळीपासून पक्ष बळकट करत असून भाजपच्या विरोधात तीन पक्ष वेगळे लढले किंवा एकत्र लढले तरीही निवडणुकीत भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. नगरपंचायत निवडणुकीत पहिला क्रमांक मिळवून भाजपने ताकद दाखवून दिली आहे.

Chandrakant Patil
Video: 'हत्ती चले अपनी चाल' बोलत चंद्रकांत पाटलांचं महापौरांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याचे पाहून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com