Satara Crime| जिलेटिनच्या साहाय्याने एटीएम फोडले; लाखो रुपये घेऊन चोरटे पसार

Satara Crime| दोन महिन्यांपूर्वीही साताऱ्यातील कराडमध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाला होता.
Satara Crime|
Satara Crime|
Published on
Updated on

सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागठाणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम जिलेटीनच्या कांड्यानी उडवून चोरट्यांनी लाखोंची रक्कम घेऊन पोबारा केला आहे. या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजली आहे. मध्यरात्री अडीच वाजच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एटीएम मधील लाखोंची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. मात्र रक्कम किती होती याची माहिती अद्याप समजू शकली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चोरट्यांनी काळा स्प्रे मारून ही धाडशी चोरी केली. दरम्यान मागील दोन महिन्यांपूर्वी कराड येथील एटीएम जिलेटीन कांड्यानी फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. मात्र नागठाणे येथील एटीएम फोडण्यात चोरट्यांना यश आले आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Satara Crime|
लाख कुळे आली तरी...; पवारांना आव्हान देणाऱ्या बावनकुळेंना आव्हाडांचे सणसणीत प्रत्युत्तर

दोन महिन्यांपूर्वीही कराडच्या ओगलेवाडी मार्गावराल एका हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांपैकी एका चोरट्याला कराड शहर पोलीस ठाण्यातील दामिनी मोबाईल बीट मार्शलनी शिताफीने अटक केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com