बाळासाहेब थोरातांनी विधानसभेत मांडला नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न विधानसभेत मांडला.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat : नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे जागोजाग काम चालू आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या हा रस्ता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांच्या मतदार संघातून जातो. या रस्त्याचा प्रश्न त्यांनी आज विधानसभेत मांडला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त 3 तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास 6 तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का ? किंवा त्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न थोरात यांनी विचारला.

Balasaheb Thorat
Thorat Vs Vikhe : बाळासाहेब थोरात म्हणाले, जनताच कोणाचा कारभार कसा ते ठरवेल

आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवरील चर्चेत भाग घेत थोरात यांनी खराब महामार्ग व त्यावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्त वाहतूक पहावयास मिळते, लेनसी शिस्त पाळली जात नाही. आपण सुरक्षित वाहन चालवत असलो तरी समोरचा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध वाहन चालवत असेलच असे नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. यावर सरकारकडे काही ठोस धोरण असले पाहिजे. जनजागृती, प्रशिक्षण याबरोबरच रस्ते व्यवस्थेत असले पाहिजेत हेही तितकेच महत्वाचे आहे. महामार्गावरील खड्डे बुजवले पाहिजेत.

नाशिक-मुंबई महामार्गाचे उदाहरण पाहता या रस्त्यांवरून वाहन चालवताना टायर फुटतात, अत्यंत निकृष्ट रस्ता आहे. त्यामुळे 3 तासांच्या प्रवासाला 6 तास लागतात. प्रवासही जीव मुठीत घेऊन करावा लागतो. या महामार्गावरचे टोल वसुल केले जातात पण रस्त्यांच्या दर्जाबद्दल, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे व एक निश्चित धोरण आहे का ते सांगावे असे थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat
Congress agitation | बाळासाहेब थोरात संतापले : म्हणाले, सरकारने सामान्यांच्या भाकरीवर कर लावला...

मुंबई-गोवा महामार्गाच्या अवस्थेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महामार्गाच्या खराब स्थितीवर अनेक भागात प्रश्न आहेत त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे, असेही थोरात म्हणाले.

या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि प्रशिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. तसेच नाशिक मुंबई प्रवासासाठी जो वेळ लागतो आहे ही बाब खरी असून त्यावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com