बेलापूर खुर्द, कारेगाव सात दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन

श्रीरामपूर ( Shrirampur ) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आता पुन्हा कोरोनाचा ( Corona ) संसर्ग टप्याटप्याने वाढत आहे.
Belapur Khurd
Belapur KhurdGaurav Salunke
Published on
Updated on

श्रीरामपूर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली आहे. जिल्हा प्रशासन त्यासाठी सतर्क आहे. श्रीरामपूर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागल्याचे दिसताच स्थानिक कोरोना समितीने दोन मोठी गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत. Belapur Khurd, Karegaon Containment zone for seven days

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द परिसरात कोरोना संसर्ग वाढल्याने पुढील सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक कोरोना समितीने घेतला आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग टप्याटप्याने वाढत आहे. तालुक्यातील कारेगाव परिसरात 30 तर बेलापूर खुर्द परिसरात 15 कोरोनाबाधित रुग्ण अॅक्टिव आहे. त्यामुळे प्रशासनाकडून दोन्ही गावात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

Belapur Khurd
कोविड सेंटरवरून खडाजंगी, श्रीरामपूर पालिकेच्या सभेत गोंधळ

काल (गुरुवारी) दिवसभरात तालुक्यात 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना अॅक्टिव रुग्णांची संख्या 200 हुन अधिक झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितली. मागील काही दिवसांत तालुक्यातील कोविड रुग्ण टप्याटप्याने वाढल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. बेलापूर खूर्द परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गाव बंद ठेवण्याचे, आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले होते.

त्यामुळे स्थानिक कोरोना समितीने बेलापूर खुर्द गावातील प्रवेशद्वार तसेच गावात जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यावर बॅरिगेड्स लावले आहेत. त्यामुळे गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने पुढील सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहे. व्यवसायिकांनी दुकाने खुले ठेवल्यास कोरोना वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे, आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

Belapur Khurd
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर

प्रारंभी व्यवसायिकांनी दुकाने खुली ठेवण्याची मागणी केली होती. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गाव बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला. बेलापूर खुर्द परिसरात सध्या 15 अॅक्टिव कोरोनाबाधित रुग्ण असून येत्या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नयेत. म्हणुन गावातील गर्दीला रोख लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती उपसरपंच अॅड. दीपक बारहाते यांनी दिली.

ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा संर्सग वाढत असल्याने कोविड रँपीड अॅन्टिजन तपासणी वाढविण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे. तसेच अॅक्टिव रुग्ण असलेल्या परिसरात विशेष खबरदारी घेतली. जात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चोखर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com