चर्चेत नसलेल्या सुरेश खाडेंनी लावला नंबर

Suresh Khade : सुरेश खाडे यांना शिंदे सरकारमध्ये कॅबीनेट मंत्रिपद
Suresh Khade
Suresh Khadesarkarnama

Suresh Khade : सांगली : आमदार सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात मिळालेल्या संधीमुळे मिरजकरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. समस्यामुक्त मतदार संघ आणि शेकडो कोटींच्या विकासाचा दावा करणाऱ्या आमदार खाडे यांच्या माध्यमातून मिरज मतदार संघास सलग दुसऱ्या वेळी मंत्रिपदाची संधी मिळाली असून खाडे यांनी मनापासून ठरवले तर ते जिल्ह्याच्‍या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात.

आमदारकीच्या तेवीस वर्षांच्या इतिहासात त्यांनी भाजपची (BJP) जिल्ह्यातील मांड पक्की करण्यात मोठे योगदान दिले. केवळ शेकडो कोटींच्या घोषणा करून चालणार नाही, तर मिरज शहरासह ग्रामीण भागातील शाश्वत विकासाचा आराखडा नव्याने बनविण्याची गरज आहे. मुंबईत, रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या सुरेश खाडे यांनी जत विधानसभा मतदार संघातून २००४ मध्ये विजय मिळवून जिल्ह्यात भाजपचे खाते उघडले.

Suresh Khade
Aurangabad : दोघांत तिसरा अन् शिरसाटांचे मंत्रीपद हुकले..

त्यानंतर मतदार संघाच्या पुनर्रचनेत आमदार खाडेंनी आपला राजकीय तळ मिरजेला हलविला. त्यांच्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत भाजपने अनेक आमदार विजयी झाल्याचा दावा ते आजही करतात. साहजिकच त्यांना गेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचे हे स्वप्न सरकारची मुदत पूर्ण होण्यापूर्वी केवळ पंच्याऐंशी दिवस आधी साकार झाले. त्यानंतर आज (मंगळवारी) त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळाली. आमदार म्हणून खाडे यांनी मिरज मतदार संघातील अनेक मूलभूत समस्यांना अचूकपणे न्याय मिळवून दिला.

भाजपची ग्रामीण भागातील पाळेमुळेही पक्की केली, ज्यामुळे मिरज पंचायत समितीमध्ये स्थापनेनंतर प्रथमच भाजपला सत्ताही मिळाली. काही महिन्यांपूर्वीच तत्कालीन महाविकास आघाडीतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अनेकांनी सुरेश खाडे यांना मुंबईहून फोन आल्याचे समजताच पुन्हा मुंबई गाठली. मंत्री झालेल्या सुरेश खाडेंना आम्ही तुमच्यासोबतच आहोत, असे सांगत दुसऱ्या वेळी मंत्री झालेल्या सुरेश खाडेंशी राजकीय वैमनस्य संपुष्टात आणले. साहजिकच आगामी राजकारणात खाडे यांचा मार्ग पुन्हा मोकळा झाला.

गेल्या दहा वर्षांत आमदार खाडे यांनी मिरज शहरातील भाजी मंडई, अर्जुनवाड रस्त्यावरील रेल्वे पूल, म्हैसाळ योजनेच्या वीजबिलासाठी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद, यासह राज्यस्तरावरही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र, मिरज शहरातील न्यायालय, शासकीय रुग्णालयाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर, उद्योजकांची स्वतंत्र औद्योगिक नगरीची मागणी यासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी निश्चितच लाभदायी ठरण्याची मिरजेच्या जनतेची अपेक्षा आहे.

Suresh Khade
सुरेश खाडेंना जयंत पाटलांचा हिशोब चुकता करण्याची संधी!

खाडेंची कारकीर्द

पेड (ता. तासगाव) येथे जन्म आणि दहावीपर्यंत शिक्षण

वेल्डिंग आणि डिप्लोमाचे शिक्षण मुंबईत

१९९५ ते २००४ मुंबईत रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश

२००४ मध्ये जत मतदार संघातून भाजपच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश

२००९ मध्ये मिरजेतून पुन्हा आमदार म्हणून विजयी

२०१४ आणि २०१९ मध्येही मिरज मतदार संघातून पुन्हा विजय

२०१९ मध्ये मंत्रिमडंळात समावेश

२०२२ मध्ये पुन्हा मंत्रिमंडळात समावेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com