जयंत पाटील, तुम्ही आमच्या माणसाला त्रास दिला!

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वासदर्शक ठरावावर जोरदार बॅटिंग केली..
Chief Minister Eknath Shinde News, Shivsena News, Jayant Patil News
Chief Minister Eknath Shinde News, Shivsena News, Jayant Patil NewsSarkarnama

सांगली : जयंत पाटील (Jayant Patil), तुम्ही इस्लामपूरच्या आमच्या शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार याला तुम्ही नाहक त्रास दिला. त्याच्या भावाला तडीपार केलं, सहकाऱ्यांवर मोक्का लावला, त्यांना जेलमध्ये घातले. आनंदराव माझ्याकडे येऊन ओक्साबोक्शी रडला. या सत्तेतून शिवसैनिकाला काय मिळाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत घणाघात केला. (Eknath Shinde Latest Marathi news)

विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आभार व्यक्त करताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसैनिकांची काय खदखद होती ती मांडली. जयंत पाटील राज्यभर दौरा करताना शिवसेनेचा आमदार असलेल्या मतदार संघात जावून ‘इथला पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच’, असा दावा करत होते. त्यावेळी शिवसेना आमदार अस्वस्थ व्हायचे, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी जयंतरावांकडे मोर्चा वळवला. खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना तर त्यांचा त्रास होताच, मात्र इस्लामपूरचा जिल्हाप्रमुख आनंदराव पवार याला नाहक त्रास दिला, असा आरोप त्यांनी केला.(Jayant Patil News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘आनंदरावला तुम्ही त्रास दिला. मोका काय, तडीपारी काय, गुन्हे काय... मला समजल्यानंतर ते मी वरिष्ठांना सांगितले. डीजी म्हणाले, ‘तो असा आहे, तसा आहे.’ मी असतो तर सांगितले असते, तो निर्दोष आहे, त्याच्यावर कारवाई करू नका, फाईल बंद करा आणि मला रिपोर्ट करा. पण, जयंतराव तुमचे लोक आनंदरावच्या कुटुंबाकडे गेले, तू राष्ट्रवादीत ये, तुझ्या भावाविरोधातील सुनावणी घेतो आणि त्याला निर्दोष करतो, असं म्हणाले. आनंदराव माझ्याकडे येऊन रडला. तुम्ही एकटेच आमचे ऐकून घेता म्हणाला. मला काही कामच नव्हतं. मी ऐकून घ्यायचो. शिवसेनेचे सरकार आहे, आपला मुख्यमंत्री आहे म्हटल्यावर सत्तेचा उपयोग झाला पाहिजे, असे शिवसैनिकाला वाटत होते. त्याऐवजी त्याला काय मिळालं, गुन्हे, तडीपारी, खोट्या केसेस, वॉंटेड... मी नगरविकासचा थोडा निधी द्यायचो आणि काही कामं करा म्हणून सांगायचो, ही अवस्था होती.’’

Chief Minister Eknath Shinde News, Shivsena News, Jayant Patil News
मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाने सारेच चकीत; अश्रू, हशा, टाळ्या आणि गुपितं फोडणारी वाक्ये

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांना विधानसभेत ज्या प्रकरणाचा उल्लेख केला, त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा भाऊ उमेश याला तडीपार करण्यात आले होते. शिवसेनेच्या इस्लामपुरातील एका पदाधिकाऱ्यावर मोक्का लावण्यात आला होता. राज्यात शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहत असताना आनंदराव पवार यांनी राष्ट्रवादीकडून झालेल्या या अन्यायाचा पत्रकार परिषदेत पाढा वाचला होता, मात्र ते शिंदे गटात सामील न होता त्यांनी ठाकरेंसोबतच जाण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com