Sangli Politics : विद्यमान मंत्र्यांसमोर उभे ठाकणार त्यांचेच एकेकाळचे स्वीय सहाय्यक? सांगलीचा पॅटर्नच वेगळा...

Suresh Khade Vs Mohan Vankhande : देवेंद्र फडणवीस कुणाच्या डोक्यावर हात ठेवणार? त्यावेळी कुणाची 'दहीहंडी फुटणार'?
Sangli Politics
Sangli PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर त्यांचेच एकेकाळचे स्वीय सहाय्यक मोहन व्हनखंडे उभे ठाकण्याची शक्यता आहे. मिरज विधानसभा मतदार संघामध्ये आगामी निवडणुकीत हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांच्या विरोधात रिंगणात राहणार का? अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. कारण या दोघांनीही दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली. दोघांनीही मिरज मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. (Latest Marathi News)

पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांच्यासमोर आता त्यांचेच माजी स्वीय सहाय्यक राहिलेले मोहन व्हनखंडे यांनी आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. मंत्री खाडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दीर्घकाळ मोहन व्हनखंडे यांनी काम पाहिले आहे. विधानसभा क्षेत्राबरोबर जिल्ह्यातील सर्व कारभार मोहन व्हनखंडे यांच्याच हातात होता, यामुळे त्यांना मतदारसंघाची चांगली ओळख आहे.

Sangli Politics
Sangli NCP News : विट्याचे पाटील जयंतरावांच्या तालुक्यात करणार अजितदादांचा जंगी सत्कार !

खाडे यांनी आपले पुत्र सुशांत खाडे यांचे राजकीय प्रमोशन केल्यानंतर मंत्री खाडे आणि स्वीय सहाय्यक व्हनखंडे यांच्यात बिनसले आहे. त्यामुळे व्हनखंडे यांनी खाडे यांच्यापासून फारकत घेतली. पण त्यांच्याकडे भाजपमध्ये मिरज विधानसभा क्षेत्राचे प्रभारीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे आता मंत्री खाडे व त्यांचेच माजी स्वीय सहाय्यक मोहन व्हनखंडे यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू झाल्याचे पहायला मिळते.

नुकतीच या दोन्ही नेत्यांकडून मिरज शहरात भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आले होते. यातून व्हनखंडे यांनी दहीहंडीच्या माध्यमातून स्वतःला विधानसभेचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या या दहीहंडीला खासदार संजयकाका पाटील वगळता भाजपच्या सर्व स्थानिक नेत्यांसह काँग्रेसचे संभाव्य लोकसभेचे उमेदवार विशाल पाटलांनी देखील हजेरी लावली. इतकच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशद्वारे व्हनखंडे यांच्या दहीहंडीला शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

Sangli Politics
Pune BJP News: भाजप शहराध्यक्षांचा पाय मुरगळला अन् पालकमंत्री झाले 'डॉक्टर'

त्याचबरोबर कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडूनही मिरज शहरांमध्ये भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्री खाड्यांच्या दहीहंडीला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आपलीच दहीहंडी ही भाजपाची असल्याचा दावा कामगार मंत्री सुरेश खाडेंकडून करण्यात आला. सध्या मिरज विधानसभा मतदारसंघांमध्ये असे चित्र असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाच्या डोक्यावर हात ठेवणार? त्यावेळी कुणाची 'दहीहंडी फुटणार' हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com