Jayant Patil: इंदापुरात पवारांची तोफ धडाडणार;जयंत पाटलांकडून हर्षवर्धन पाटलांचा 'कार्यक्रम' फिक्स

Political News : राज्याच्या भवितव्याची कोणतीही काळजी नाही, अशी प्रवृत्ती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच दिसते, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil Sarkarnama
Published on
Updated on

Satara NCP News : सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जे द्यायचे नाही त्याची घोषणा करायचा प्रकार महायुती सरकारने सुरु केला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून अतिरिक्त सव्वा लाख कोटींची कर्ज मागणी राज्य सरकारने केली आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला पाच ते सहा हजार कोटी खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे. महाराष्ट्र घाण ठेवण्याचा प्रकार सुरु असून त्यांना त्यांची लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याच्या भवितव्याची कोणतीही काळजी नाही, अशी प्रवृत्ती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच दिसते, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

दरम्यान, येत्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता इंदापूरात खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राज्यस्तरावर काम करणारा नेता आमच्या पक्षात येतोय याचा विशेष आनंद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Jayant Patil News)

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा शुक्रवारी साताऱ्यात दाखल झाली. यावेळी शाहू कलामंदिरात मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुधीर पवार आदी उपस्थित होते.

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेस जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माण तालुक्यातही प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील काही नेते मंडळी आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत. वाईचे मदन भोसले यांच्या मात्र, पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. जावळीचे अजित पवार गटाचे अमित कदम यांची आमच्या पक्षातून लढण्याची इच्छा असली तरी त्यांच्याशी माझी भेट झालेली नाही. त्यांनी पक्षांकडे अर्ज केला असेल तर त्यांची मुलाखत होईल.

महायुती सरकारवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, 'सध्या योजनांच्या घोषणा सुरु असून जे द्यायचे नाही, त्याची घोषणा करायला त्यांना काय बिघडतंय. एका मंत्रीमंडळाच्या बैठकीत 56 विषयांवर निर्णय घेतले जात आहेत. रिझर्व्ह बॅंकेला राज्य सरकारने सव्वा लाख कोटींचे अतिरिक्त कर्ज मागितले आहे. त्यातून त्यांना आठवड्याला पाच हजार हजार कोटी रुपये खर्च करायचे आहेत, यातून राज्याची काय परिस्थिती हे लक्षात येते. एकूणच महाराष्ट्र घाण ठेवण्याचा प्रकार असून त्यांना त्यांची लाडकी खुर्ची महत्वाची आहे. राज्याच्या भवितव्याची त्यांना काळजी नाही, अशी प्रवृत्ती मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचीच दिसते.

Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Raj Thackeray News : राज ठाकरे भडकले; म्हणाले, 'मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून...'

राष्ट्रवादीच्या आजपासून पुण्यात मुलाखती

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती येत्या पाच, सहा व सात ऑक्टोबरला पुण्यात खासदार शरद पवार स्वत: घेणार आहेत. जनतेतून आम्हाला चांगला प्रतिसाद असून प्रत्येक मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची क्षमता आहे. जास्तीत जास्त जागांवर उमेदवार विजयी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न आहे.

वाई, फलटणमध्ये दोन तीन चेहरे

वाई व फलटण मतदारसंघातून विद्यमान आमदारांविरोधात नवीन चेहरा आम्ही देणार असून त्यासाठी या ठिकाणी दोन तीन चेहरे आमच्याशी संपर्क ठेऊन आहेत. लवकरच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय होईल. सातारा जिल्ह्यातील काही नेते मंडळीही आमच्या संपर्कात असून याबाबत लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar, Harshvardhan Patil, Ankita Patil
Jalna News : जालन्यातील मेडिकल कॉलेजवरून गोरंट्याल, खोतकरांमध्ये खडाजंगी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com