मधुकर नवले म्हणाले, हा दावा तर लोकशाहीची टिंगल...

काँग्रेसचे ( Congress ) जेष्ठ नेते मधुकर नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांच्यावर टीका केली.
Madhukar Nawale, Akole
Madhukar Nawale, AkoleSarkarnama

अकोले ( जि. अहमदनगर ) : अकोले नगरपंचायतचा निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. अकोलेतील चार प्रभागातील काँग्रेस, आर.पी.आय (गवई गट) च्या उमेदवार प्रचाराचा प्रारंभ अगस्ती महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे ( Congress ) जेष्ठ नेते मधुकर नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार डॉ. किरण लहामटे ( Dr. Kiran Lahamte ) यांच्यावर टीका केली. Madhukar Navale said, this claim is a parody of democracy ...

यावेळी अध्यक्षस्थानी रामनाथ नाईकवाडी होते. काँग्रेस तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, मिनानाथ पांडे, भाऊसाहेब नाईकवाडी, आरिफ तांबोळी, माजी नगराध्यक्षा संगिता शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे, विक्रम नवले, संपतराव कानवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Madhukar Nawale, Akole
मधुकर नवले म्हणाले, आम्हीही भिकेसाठी तुमच्यापुढे झोळी ठेवलेली नाही...

मधुकर नवले म्हणाले की काही राजकीय पक्षांना नैतिकता शब्दाचा राग येतो मात्र काँग्रेस पक्ष नैतिकतेवरच चालतो. तालुक्यात एकही संस्था दाखवा जी काँग्रेस पक्षाशिवाय उभी राहिली ? सगळे एकत्र येवून संस्था उभ्या राहतात. त्याचे नेतृत्व कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. आमच्या शिवाय संस्था चालवण्याचा प्रयत्न केला तर काय होते हे ही नगरपंचायत निवडणुकीत जनता दाखवणार आहे.

ते पुढे म्हणाले की, पडद्या आडून काय राजकारण चालते हे लोकांना आता कळते. राजकीय पक्षा एवजी स्वतःच्या टोळ्यांचे राजकारण करता व त्याला पक्षाचे नाव देताय. गावा-गावात वाड्या-वाड्यात वाद लावणारा काँग्रेस पक्ष नाही. त्याग बलिदानाचा इतिहास असलेला काँग्रेस पक्ष आहे. विकासाचे व्हिजन व ध्येय असलेला काँग्रेस पक्ष आहे. तालुक्यात स्वच्छ राजकारण करण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे. त्यासाठी नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढत आहे.

Madhukar Nawale, Akole
मधुकर नवले म्हणाले, अकोलेचे बिहार झाले आहे...

आमदारांवर टीका करताना मधुकर नवले म्हणाले की आज आमदार निवडणूक झालेल्या सर्व 13 जागा निवडून येण्याचा दावा करताय ही लोकशाहीची टिंगल करत आहे. आमदार साहेब इतर नवले प्रेम करतात तेवढेच मधुकर नवले ही करतील पण थोडा विश्वास ठेवा. आश्चर्य वाटते आमदारांचे अडीच वर्ष विधानसभेला झाले मात्र अकोले शहराचा कळीचा मुद्दा पिण्याचे पाण्याचा प्रश्न, याकडे अद्याप लक्ष दिले नाही. धरणात मुबलक पाणी असताना प्रवरेला केवळ पाणी शेतीसाठी सोडले जाते मात्र पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही. यावर आमदार का बोलत नाही ? असे प्रश्न नवले यांनी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com