मोदी व केजरीवाल सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात : महाविकास आघाडीने केली टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Paole ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रवक्ते महेश तपासे यांनी भारतीय जनता पक्ष व आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली.
Mahavikas Aghadi Vs BJP
Mahavikas Aghadi Vs BJPSarkarnama

Mahesh Tapase : भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत अवमूल्यन होत आहे. अशा स्थितीत रुपयांच्या नोटांवरील प्रतीकांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Paole )राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) प्रवक्ते महेश तपासे यांनी भारतीय जनता पक्ष व आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारताची अर्थव्यवस्था चिंताजनक बनली असताना आता रुपयाचे दररोज होणारे अवमूल्यन पाहता जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपने नोटांवरील प्रतीकांचे धार्मिक राजकारण सुरू केल्याची महाविकास आघाडीची भावना आहे.

Mahavikas Aghadi Vs BJP
Sushma Andhare On Arvind Kejriwal | नोटांवर देवांचे फोटो लावण्याच्या मुद्द्यावरून अंधारेंची सडकून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी टीका करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील भाजप नेत्यांच्या विविध मागण्यांची खिल्ली उडविली आहे.

देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत असून डॉलरच्या तुलनेत दररोज रूपयाची किंमत घसरत आहे. हे अपयश मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे असून ते झाकण्यासाठीचं अशा प्रकारे नोटावंर देवदेवतांची छायाचित्रे असावीत, अशी धार्मिक चर्चा सुरू केल्याची टीका तपासे यांनी केली.

Mahavikas Aghadi Vs BJP
Currency : भारतीय नोटांवर पंतप्रधान मोदींचाही फोटो असावा : भाजप आमदाराची मागणी!

ते पुढे म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महात्मा गांधींसह लक्ष्मी आणि गणेशाच्या प्रतिमा हव्यात, अशी मागणी केली. यानंतर देशभरात विविध चर्चा सुरू झाल्या. पण महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज तर आमदार राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असावे, अशी मागणी केली.

यावरून, राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगलाय संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आणि गलथानपणामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. दिवसेंदिवस रुपयाचे अवमूल्यन होत आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर आहे. जनता निराश असून देशात सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे.

Mahavikas Aghadi Vs BJP
Eknath Shinde : नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद; टिकेचे उत्तर आम्ही कामाने देऊ!

नोटांवर देवी-देवतांच्या प्रतिमा छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणाऱ्या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. केजरीवालांच्या चेहऱ्यावरील बुरखा आता फाटला असून त्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com