Satara Political News : सातारा लोकसभेबाबत खासदार उदयनराजेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, लोकांचा आग्रह लक्षात...

Udayanraje Bhosale खासदार उदयनराजे यांनी आज केली सातारा शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Satara Political News : लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. पण, याबाबत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र, सावध भूमिका घेतली आहे. या विषयी पत्रकारांनी आज त्यांना विचारले असता ते म्हणाले, आताच सगळं उघड केलं तर कसं होणार. लोकांचा आग्रह असतो तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज सातारा शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा लोकसभेच्या निवडणुकीसह सातारा Satara शहरातील विविध विकास कामे व गड किल्ल्यांच्या संवर्धनावर भाष्य केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा शहराच्या विकासाचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पहाणी केली. या स्मारकासाठी १६ कोटी मंजूर असून आतापर्यंत आठ कोटी मिळाले आहेत. काम पूर्ण झाल्यावर उर्वरित आठ कोठी शासनाकडून मिळतील.

शहिद कर्नल संतोष महाडिक स्मारकाचे काम सुरु असून त्यासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर आहे. त्यापैकी दीड कोटी उपलब्ध झाले असून स्मारकाचे काम प्रगती पथावर आहेत. उर्वरित एक कोटी शासनाकडून येणे बाकी आहे. या स्मारकाच्या उद॒घाटनासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निमंत्रित करुन त्यांच्या हस्ते उदघाटन घेण्याचा प्रयत्न आहे.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale | रान पेटलं तर कोणीही अडवू शकणार नाही | Satara News |

सातारा लोकसभेच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, सगळंच आताच उघड केलं तर कसं होणार. लोकांचा आग्रह असतो तो पण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर रोहित पवारांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेल्या टीकेवर ते म्हणाले, शंभूराज देसाई दुष्काळी भागात गेले नाहीत हा भाग नाही.

पण ठपका ठेवायचा म्हणून ते गेले नाहीत म्हटले जाते. त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत दुष्काळी परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपापले काम करतात. आता आम्ही कामे केलीत म्हणून सगळे येऊन बघतात असा टोला त्यांनी लगावला.

Edited By Umesh Bambare

MP Udayanraje Bhosale
Maan NCP News : रोहित पवारांनी शंभूराज देसाईंना डिवचले; म्हणाले, पालकमंत्री माण तालुक्यात किती वेळा आले होते...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com