Koregaon :'फॉक्सकॉन'वरून राष्ट्रवादीचा मोर्चा; शिंदे-फडणवीस सरकारचा केला निषेध

तेजस शिंदे Tejas Shinde म्हणाले, ‘‘शिंदे- फडणवीस Shinde-Fadanvis सरकारने फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प Foxcon Project घालवून राज्यातील बेरोजगार युवकांवर अन्याय केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.
Koregaon NCP Morcha
Koregaon NCP Morchasarkarnama
Published on
Updated on

कोरेगाव : सुमारे दोन लाख युवकांना रोजगार देऊ शकणारा फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून केली. यावेळी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला जाण्यास कारणीभूत ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारचा तीव्र निषेध नोंदविला.

कोरेगाव येथील आझाद चौकातून आज सकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चेकरी युवक फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प गुजरातला जाण्यात कारणीभूत ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या तीव्र निषेधाच्या घोषणासह गुजरात सरकार तुपाशी, भारत सरकार उपाशी, पन्नास खोके एकदम ओके आदी घोषणांसह शशिकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते.

Koregaon NCP Morcha
साताऱ्याच्या दोन राजांना शशीकांत शिंदे दणका देणार?

मोर्चा हुतात्मा स्मारकासमोर आल्यावर तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तेजस शिंदे आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे गेला. यावेळी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन दिले. यावेळी तेजस शिंदे म्हणाले, ‘‘शिंदे- फडणवीस सरकारने फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प घालवून राज्यातील बेरोजगार युवकांवर अन्याय केला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.

Koregaon NCP Morcha
'वेदांता फॉक्सकॅान' प्रकल्प : ही तर फडणवीसांनी मोदींच्या आग्रहाखातर दिलेली रेवडी भेट!

गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यातील भाजप केंद्रातील मंत्री आणि सरकारला खूश करण्यासाठी महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. भाजपने राज्यात येऊ घातलेले एअर ट्रॅफिक हेडक्वॉटर, रिझर्व्ह बँकेचे महत्त्वाचे केंद्र गुजरातला हलवण्यात योगदान दिले. स्थानिक सरकार व स्थानिक आमदार पन्नास खोकी घेऊन गप्प आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मागे पडतो आहे.

Koregaon NCP Morcha
गोपीचंद पडळकरांना साताऱ्यात फिरकू देणार नाही : तेजस शिंदे

आता हे येथील जनतेला कळू लागले असून जनता लवकरच हे सरकार उलथवून लावेल. मोर्चात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन इंगवले, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष अजित बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश होळ, कोरेगाव शहराध्यक्ष सनी शिर्के, अमरसिंह बर्गे, गणेश धनवडे, सोमनाथ बर्गे, प्रकाश बर्गे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com