Pandharpur : तीर्थक्षेत्र काॅरिडाॅर बाधितांबद्दल विखे पाटलांचे महत्वाचे वक्तव्य..

Pandharpur : स्थानिक नागरिकांना उध्वस्त होऊ देणार नाही
Pandharpur Vikhe Patil
Pandharpur Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राबाबत राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे आदेश आहेत. पंढरपूरातील नागरिकांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंबंधी पंधरा दिवसात सादर करण्यासंबंधीचे सूचना कराव्या, असे सांगितले. यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंढरपूरच्या नागरिकांना दिले आहे.

Pandharpur Vikhe Patil
Sachin waze ला जामीन मंजूर : पण मुक्काम तुरुंगातच

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नियोजनाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पंढरपुरातील व्यापारी आणि नागरिकांची बैठक संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विखे-पाटील यांनी नागरिकांना याबाबत काही आश्वासन दिले आहे.

Pandharpur Vikhe Patil
Sachin waze ला जामीन मंजूर : पण मुक्काम तुरुंगातच

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारी आणि वारक-यांना लक्षात घेऊन बनवण्यात येत आहे. यामध्ये येथील स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून हे साकारणार नाही, असा विश्वास नागरिकांना दिला. दरम्यान, नागरिकांकडून ही सुधारीत आराखडा आपल्याला १५ दिवसात देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शहरातील विकास आराखडा हा भवितव्याचा विचार करत, केला जाणार आहे. यामध्ये विस्थापित होणऱ्यांना चांगला मोबदला देण्यात येणार असेही, विखे पाटील यांनी आश्वासन दिले.

वाराणसी व उज्जैन या ठिकाणच्या आराखड्याला तेथील व्यापारी अथवा नागरिकांनी विरोध केले आहे, आता याच पद्धतीने पंढरपूर येथील व्यापारी आणि नागरिकांना चांगला मोबदला देऊन, त्यांना विश्वासात घेतल्यानंतरच आराखड्याचा विकास होईल. ज्यावेळी हे राबवण्यात येईल, सर्वांना न्याय देवूनच बनवले जाईल, असे विखे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com