Atul Bhosale: रोजगार देऊ न शकणारे काय भले करणार

Atul Bhosale: कासारशिरंबेतील प्रचारसभेतून पृथ्‍वीराज चव्‍हाण यांना सवाल
Karhad South
Karhad South Sarkarnama
Published on
Updated on

Atul Bhosale: दहा वर्षांत विरोधकांनी एकाही युवकाला काम दिले नाही. एमआयडीसीत नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करू शकले नाहीत. दोन पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल अतुल भोसले यांनी केला.

कासारशिरंबे येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडिराम पाटील होते. सरपंच उमेश पवार, उपसरपंच संतोषराव यादव, सुदन मोहिते, माजी सरपंच बाबूराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक मिलिंद पाटणकर, तानाजी यादव, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, संजय यादव, बनकरराव पवार, बाबूराव माने, एकनाथ गायकवाड, राजाराम माने, भानुदास कचरे उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, ‘‘विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत मतदारसंघात येऊन किती वेळा लोकांची विचारपूस केली, विरोधकांच्या व्यासपीठावरून सतत माझ्या माता- भगिनींचा अपमान होतोय; पण विद्यमान लोकप्रतिनिधी त्याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत, याचे मला वाईट वाटते.

दरवेळेप्रमाणे यावेळेलाही विरोधकांकडून कृष्णा कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, चॅरिटेबल ट्रस्टबाबत टीका होत आहे; पण लोकसुद्धा विरोधकांच्या या टीकेला आता कंटाळले आहेत. या उलट आम्ही सदैव विकासाची कास धरून कऱ्हाड दक्षिणमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणला.

कृष्णा समूहाद्वारे आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मितीसाठी काम सुरू आहे. शिरवळ येथे लवकरच कृष्णा विश्व विद्यापीठाची नवी शाखा सुरू होत असून, दोन वर्षांत हा प्रकल्प उभा करून मतदारसंघातील अडीच हजार तरुणांना याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.

शासनाच्या लाडकी बहीण योजना, बांधकाम कामगार योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी, भावांनी तसेच ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिकांनी मला भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन, आपली सेवा करण्याची संधी द्यावी.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com