Ashutosh Kale: कोपरगावमधील रुग्णालय जनतेच्या आरोग्यासाठी वरदान : कृष्णा आढाव

Ashutosh Kale: मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी या सुविधा गेल्या पाच वर्षांत मार्गी
Kopargaon Assembly
Kopargaon AssemblySarkarnama
Published on
Updated on

Ashutosh Kale: कोपरगाव मतदारसंघात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून साकारण्यात येत असलेले उपजिल्हा रुग्णालय जनतेच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी केले.

शहरातील प्रभाग तेरामध्ये महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Kopargaon Assembly
Ashutosh Kale: विकासाचा वेग कायम ठेवणार: आशुतोष काळे

आढाव म्हणाले, की मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी या सुविधा गेल्या पाच वर्षांत आमदार काळेंनी मार्गी लावल्या आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची वचनपूर्ती करून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे.

मतदारसंघातील रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे. त्यातून आर्थिक खर्च मोठा होतो. उत्तर जिल्ह्यात दुसरे उपजिल्हा रुग्णालय नाही. ही अडचण ओळखून काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविला.

त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. १०० बेडच्या या उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, अतिदक्षता विभाग आदींसह आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. भविष्यात त्यांना मतदारसंघाचा विकास करण्यासाठी अधिकची प्रेरणा मिळावी. यासाठी काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या.

Kopargaon Assembly
Ashutosh Kale: आमदार काळेंना मताधिक्य द्या: लोहाटे

माहेगाव देशमुखसह कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे.

संवत्सर येथील ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, कर्मचारी निवासस्थान, पोहेगाव येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, चासनळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी, मढी बुद्रुक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजुरी, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, तसेच शहरात आरोग्यवर्धिनी सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्याची काळजी काळे यांनी दूर केली.

- कृष्णा आढाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com