Patan News : पाटणकरांच्या पाठपुराव्याला यश; कोयना पर्यटन विकासाचा मार्ग मोकळा

Koyana Dam सातारा येथील कोयना धरण शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे.
Vikramsinh Patankar, Eknath Shinde
Vikramsinh Patankar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Patan News : कोयना धरण शिवसागर बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या सात किलाोमीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र अबाधित ठेवून उर्वरित जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्हा जल पर्यटनात मोठी झेप घेऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सातारा येथील कोयना धरण Koyana Dam शिवसागर जलाशयात जल पर्यटन विकसित करण्यासाठी मोठी संधी आहे. या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल. यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर Vikramsinh Patankar यांनी सात वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. याला आता यश आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या शिवसागर धरणामध्ये जल पर्यटन विकसित झाल्यास महाबळेश्वर, पाचगणी, वाई, कास पठार येथे येणारा पर्यटक शिवसागर जलाशयाकडे वळविता येईल. या माध्यमातून सातारा जिल्ह्यासाठी पर्यटकांची नवीन बाजारपेठ निर्माण होऊ शकणार आहे.

त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार संधी निर्माण होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्था विकसित होऊ शकणार आहे. या भागाचा शाश्वत आणि पर्यावरण आधारित विकासाला वेग देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

Vikramsinh Patankar, Eknath Shinde
Patan Political News : कराड-चिपळूण रस्त्याचा पैसा कोणाच्या खिशात; खड्ड्यात भात रोपे लावून सर्वपक्षीयांकडून निषेध

या निर्णयानुसार धरण क्षेत्राच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धरण आणि आजूबाजूच्या सात किमीपर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित म्हणून अबाधित ठेवले आहे. तसेच सात किमीनंतरच्या दोन किमीच्या क्षेत्राला बफर झोन घोषित केले आहे.

त्यापलीकडील जलाशयाचा विस्तीर्ण परिसर जल पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ४७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Edited By Umesh Bambare

Vikramsinh Patankar, Eknath Shinde
Satara Dam News: टंचाईच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी राखून ठेवण्याचे शंभूराज देसाईंचे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com