Pawar-Chavan Conflict: पवार - चव्हाण संघर्ष कुणाच्या पथ्यावर....

Sharad Pawar News: महाराष्ट्रातून जाऊन दिल्लीत जम बसवलेले दोन प्रमुख नेते म्हणजे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे आहेत.
Prithviraj Chavan, Sharad Pawar
Prithviraj Chavan, Sharad Pawarsarkarnama

Satara News : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि कर्नाटक निवडणूक यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. या युद्धाचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सतत डिवचणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांना मतदार संघात कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो.

राज्यातून जाऊन दिल्लीत जम बसवलेले दोन प्रमुख नेते म्हणजे शरद पवार Sharad Pawar आणि पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे आहेत. या दोघांचही दिल्लीत वजन आहे मात्र दोघांमध्येही नेहमी सुप्त संघर्ष राहिला आहे. हा संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करता आहेत.

त्याचबरोबर देशातील भाजपाविरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठीही पवार प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. या वादाचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल, असं नाही.

Prithviraj Chavan, Sharad Pawar
Prithviraj Chavan: कर्नाटकात आमचचं सरकार येणार ; 113 पेक्षा जास्त जागा मिळणार पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास

मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड दक्षिण मतदारसंघात याचे पडसाद उमटतील. कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांचीही पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील आणि भाजपा नेते डॉ.अतुल भोसले यांचे सख्य वाढले आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा फटका बसेल असे चित्र आहे.

Prithviraj Chavan, Sharad Pawar
Sushma Andhare पवारांसमोर का रडल्या? | Sharad Pawar| NCP| Shivsena | Sarkarnama video

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com