मुस्लिम समाज नेहमीच सोबत औरवाडच्या सभेत विरोधकांवर राजेंद्र पाटील-यड्रावकरांची टीका

: ‘मुस्लिम समाजाशी आमचे जवळचे संबंध आहेत. ज्या ज्या वेळेला संकटे आली तेव्हा मुस्लिम समाज पाठीशी उभा राहिला आणि मुस्लिम समाजावर ज्या ज्या वेळी संकटे आली, त्या त्या वेळी मी छातीचा कोट करून पुढे राहिलो आणि यापुढे राहणार आहे,
मुस्लिम समाज नेहमीच सोबत औरवाडच्या सभेत विरोधकांवर राजेंद्र पाटील-यड्रावकरांची टीका
Published on
Updated on

जयसिंगपूर : ‘मुस्लिम समाजाशी आमचे जवळचे संबंध आहेत. ज्या ज्या वेळेला संकटे आली तेव्हा मुस्लिम समाज पाठीशी उभा राहिला आणि मुस्लिम समाजावर ज्या ज्या वेळी संकटे आली, त्या त्या वेळी मी छातीचा कोट करून पुढे राहिलो आणि यापुढे राहणार आहे,’ अशी ग्वाही राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

औरवाड येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली. यावेळी इम्तियाज पटेल, साहेबपाशा पटेल, कादर पटेल, आप्पासाहेब म्हैशाळे, सरपंच शफी पटेल, उपसरपंच अफसर पटेल, सईद पटेल गुरुजी, लतीफ पटेल, राजू रावण, बाशू मुल्ला, राजू गावडे, नारायण गावडे, आनंदा पाटील, विजय दुग्गे, यासीन बहादूर, रवी माने, अण्णाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.

मुस्ताक पटेल यांनी स्वागत केले. दादेपाशा पटेल, रशीद पटेल, लतिफ पटेल, राजू रावण, आनंदा पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. गौरवाड येथे झालेल्या प्रचार फेरीला प्रतिसाद मिळाला. कवठेगुलंद येथे झालेल्या सभेत माजी सभापती मल्लाप्पा चौगुले यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. शेडशाळ येथे भाजपचे संजय पाटील यांनी मताधिक्याने विजय निश्चित असल्याचे सांगितले.

गणेशवाडीमध्ये सदाशिव आंबी यांनी आमदार यड्रावकर यांना मत म्हणजे विकासाला मत, असे सांगून विजयाचा निर्धार केला. आलास येथे सय्यद सादात दर्ग्यात गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार झाला. बुबनाळ येथे झालेल्या सभेत जगन्नाथ जाधव यांनी आमदार यड्रावकर यांच्या विजयाची सभा बुबनाळमध्येच घेणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com