Ramdas Athawale यांची मोठी घोषणा : शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविणार

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 साली केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) पराभूत झाले होते.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 साली केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale ) पराभूत झाले होते. मात्र त्यांनी त्याच मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा आज बोलून दाखविली. अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, शिर्डीतून लोकसभा लढविण्याची माझी इच्छा आहे. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप व शिंदे गटाची मागणी असेल, मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढेल. भाजप व मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी निश्चित शिर्डीतून निवडणूक लढेल, असे त्यांनी सांगितले.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : 50 खोके, बाकी सगळे ओके, तुम्ही मारा छक्के...

2009च्या निवडणुकीतील आठवणी जाग्या करत ते म्हणाले, निवडणुकीत हारणे,जिंकणे आपल्या हातात नसते. ते जनतेच्या हातात असते. त्यामुळे काही अडचणीमुळे मी शिर्डीत हरलो होतो. हरलो तरी मी नाराज नाही. शेवटी लोकशाहीत हार-जीत असते. यावेळेला मी उभा राहिलो तर चांगल्या मतांनी मी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ramdas Athawale
गुंडगिरीने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही... रामदास आठवले

आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा महिन्यात तिसरा दौरा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. लोखंडे हे भाजपकडून तीन वेळा कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून आमदार होते. त्यामुळे शिवसेना फुटल्यावर लोखंडे हे शिंदे गटात जातील याची शक्यता होती. त्यानुसार लोखंडे हे शिंदे गटात गेले. अशा स्थितीत आठवले यांना शिर्डीतून निवडणूक लढायची असेल तर भाजप व शिंदे गटाकडून पाठिंबा लागणार आहे.

Ramdas Athawale
Video: ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले ज्यांनी धंदे..त्यांचे नाव एकनाथ शिंदे; रामदास आठवले

शिर्डी लोकसभा मतदार संघावर विखे गटाचे प्रभुत्व आहे. तर संगमनेर तालुक्यात थोरातांचे वर्चस्व आहे. 2009च्या निवडणुकीत विखे गटामुळे आठवलेंचा पराभव झाला होता. त्यावेळी आठवले व विखे दोघेही आघाडीत होते. पुन्हा आठवलेंना शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे. आता आठवले व विखे दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे आठवलेंची इच्छा जरी असली तरी परिस्थिती आठवलेंसाठी काय आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे. या भागात मराठा मतदार संख्येने जास्त आहे. हा मतदार आठवलेंना मतदान करेल का? यावर पुढील गणिते ठरण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com