डिसले गुरुजींच्या मागची इडा पिडा टळेना; आता जिल्हा परिषदेने धाडली नोटीस

तीन वर्षांपासून कामावर हजर न राहता पगार घेतल्याचा ठपका ठेवल्यामुळे रणजितसिंह डिसले (Ranjitsingh Disale) यांनी राजीनामा देण्याची व्यथा बोलून दाखवली होती.
RanjitSingh Disale
RanjitSingh Disalesarkarnama

सोलापूर : ग्लोबल टिचर पुरस्कार (Global Teacher Award) विजेते रणजितसिंह डिसले (RanjitSingh Disale) यांना अमेरिकेतील (America) फुलब्राईट संस्थेची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. मात्र त्यांना सोलापूर (Solapur) जिल्हा शिक्षण विभागाकडून परवानगी मिळत नव्हती. त्यांनी कलेल्या अर्जात त्रूटी असल्याचे सांगून त्यांचा प्रस्ताव नाकारत त्यांना पुन्हा मुख्याध्यपकांकडे जाण्यास सांगितले होते. तसेच, त्यांच्यावर तीन वर्षांपासून कामावर हजर न राहता पगार घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे डिसले यांनी राजीनामा देण्याची व्यथा बोलून दाखवली होती.

या प्रकरणाची दखल स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली असून, रजेचा अर्ज प्रलंबित ठेऊन पैसे कोणी मागितले आणि मानसिक त्रास कोणी दिला याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी नोटीस सोलापूर जिल्हा परिषदेने (Solapur ZP) ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांना पाठवली आहे.

RanjitSingh Disale
डिसले गुरुजींनी काळजी करू नये : शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासन नरमले!

रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या फुलब्राईट संस्थेची शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत ऑगस्टमध्ये जाण्यासाठी संस्थेला जिल्हा परिषदेच्या परवानगीचे पत्र 25 जानेवारीपर्यंत सादर करणे आवश्यक होते. यासाठी डिसले यांनी केलेला अर्ज शिक्षण विभागाने दीड महिने प्रलंबित ठेवला. पाठपुरवठा केल्यावर मानसिक त्रास दिला आणि पैश्यांची मागणी केली, असा आरोप डिसले गुरुजींनी प्रसारमध्यमांमध्ये जाहीरपणे केला होता.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून दाखल घेण्यात आली आणि डिसले यांना तात्काळ परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले. त्याप्रमाणे प्रशासनाने रविवारी कामकाज करीत त्यांना परवानगी दिली. मात्र, मानसिक त्रास आणि पैश्यांच्या मागणीच्या आरोपमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा मालिन झाली आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत प्रशासनाने खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com