रोहित पवारांनी सुनावले : भाजप मनसेचा वापर करून घेतेय

मनसेचे नेते योगेश खैरे यांनी बृजभूषण सिंह व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर ट्विटवरून टीका केली.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

अहमदनगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचा अयोद्ध्या दौरा रद्द केला आहे. राज ठाकरेंना अयोद्धेत येऊ देणार नाही असे सांगणाऱ्या खासदार बृजभूषण सिंह यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समवेतचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. यावरून मनसेने बृजभूषण सिंह व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर ट्विटवरून टीका केली. या टीकेला आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांची ट्विट करत उत्तर दिले. ( Rohit Pawar told MNS's Khaire: BJP is using MNS )

रोहित पवार यांनी म्हंटले आहे की, राज ठाकरे साहेब राज्यातले मोठे नेते असून मला त्यांचा आदर आहे. पण भाजप आपला वापर करून घेतंय तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खासदार बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं बघावं आणि आगामी महापालिका निवडणुकीत ते मुंबईत प्रचाराला आले तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये.

Rohit Pawar
राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; रोहित पवार म्हणाले, भाजपने....

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, राहिला प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार बृजभूषण सिंह यांच्या एकत्रित फोटोचा तर शरद पवार हे अनेक वर्षे 'महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे'चे अध्यक्ष आहेत आणि खासदार बृजभूषण सिंह हे 'भारतीय कुस्ती संघा'चे अध्यक्ष आहेत.

Rohit Pawar
Video : रोहित पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील

मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळं संभाव्य अपघात टळून स्वतःच्याच पक्षाचा बचाव तरी करता येईल, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com