जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाचा थाटच न्यारा... दोन लाख लग्नपत्रिका, बड्या नेत्यांची उपस्थिती

Jayant Patil Son Pratik Patil : या विवाह सोहळ्यात हजारो चौरस फुटांचा शामियाना...
Jayant Patil Son Pratik Patil
Jayant Patil Son Pratik Patil Sarkarnama

Jayant Patil Son Pratik Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटीलचा विवाह सोहळा सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडणार आहे. हा विवाह सोहळा २७ नोव्हेंबरला असून या शाही विवाहाची लगबग गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. वाळवा मतदारसंघात तब्बल दोन लाख लग्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांसाठी हा शाही विवाह एक पर्वणीच ठरणार आहे.

या विवाह सोहळ्यात हजारो चौरस फुटांचा शामियाना, दोन लाख लग्नपत्रिका, वधू-वरासाठी भव्य स्टेज, एकाच वेळी पाच हजार लोकं जेवण्याची व्यवस्था, तर राज्यातील अनेक बड्या नेत्यांची या सोहळ्यासाठी हजेरी, असं सर्व नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या लग्नाची जिल्ह्यात नव्हे तर राज्यात मोठी चर्चा रंगली आहे.

प्रतीक पाटील यांचा रविवारी (दि.२७) राजारामनगर येथे उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची मुलगी अलिका हिच्याशी विवाह होणार आहे. या विवाहासाठी राजारामनगरमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या विवाहासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं असून व्यासपीठासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Jayant Patil Son Pratik Patil
Kolhapur News : आधी पद नंतर प्रवेश; कोल्हापुरातील बड्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंसमोर अट!

हजारो चौरस फुटांचा शामियाना...

जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटीलच्या शाही विवाह सोहळ्यासाठी इस्लामपूरनगरी सज्ज झालीय. या लग्नासाठी तब्बल दोन लाख लग्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. एवंढच नाही तर हजारो चौरस फुटांचा शामियाना उभा करण्यात आलाय.

एकाच वेळी पाच हजार लोकं जेवणार...

‘याची देही, याची डोळा’ असा हा शाही विवाह सोहळा असणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी खास जेवण्याची व्यवस्था करण्यात आलीय. एकाच वेळी तब्बल पाच हजार लोकं जेवतील अशी व्यवस्था करण्यात आलीय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com