Lok Sabha Election: सातारची 'ती' परंपरा कायम..., लोकसभा उमेदवारीवरुन चव्हाणांचं सूचक वक्तव्य

Prithviraj Chavan News: शरद पवारांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर आणि सुनील माने या नावांची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं. मात्र, अद्याप इथून निवडणूक कोण लढवणार? हे ठरलेलं नाही.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Satara Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तरीही महाविकास आघाडीकडून सातारा लोकसभा मतदार संघाचा (Satara Lok Sabha Constituency) उमेदवार कोण असणार हे अद्याप ठरलेलं नाही. आघाडीत सातारची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाला गेली आहे. त्यामुळे या जागेवर शरद पवार कोण उमेदवार देणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांनी अद्याप इथला उमेदवार ठरला नसल्याचं सांगितलं. शिवाय सातारा लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचंही पवारांनी सांगितलं.

याचवेळी पवारांनी सातारा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार कोण असणार याबाबत चार नेत्यांची नावे घेतली होती. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच आता काँग्रेस (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी, महाविकास आघाडीकडून या मतदार संघासाठी सर्वात सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तो सक्षम उमेदवार कोण? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांनी (Sharad Pawar) साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर आणि सुनील माने या नावांची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं. मात्र, अद्याप इथून निवडणूक कोण लढवणार हे ठरलेलं नाही. अशातच आज आघाडीच्या नेत्यांची सातारच्या जागेबाबत एक बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "महाविकास आघाडीतर्फे सर्वात सक्षम आणि पावरफूल उमेदवार देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न चालू आहे. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या जागेचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. ते आमचे सर्वांशी चर्चा करत आहेत. शिवाय त्याबाबत मुंबईतही चर्चा झाली इथेही चर्चा होत आहे."

Prithviraj Chavan
Sangali Lok Sabha Election 2024 : 'सांगली'त काँग्रेस की ठाकरे सेना; दिल्लीत वाद मिटणार?

शिवाय उमेदवारीबद्दल इथे काहीही बोलणार नाही, याबाबतची बंद खोलीत सुरु आहे. ती चर्चा व्यासपीठावर होणार नाही. मात्र, आतापर्यंत सातारा लोकसभेला कुठल्याही जातीवादी पक्षाचा उमेदवार यशस्वी झालेला नाही. ही परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे. उमेदवाराबद्दल काहीही जाहीरपणे चर्चा करू नका याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार जो निर्णय घेतील तो निर्णय महाविकास आघाडी (MVA) मान्य करेल, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

Prithviraj Chavan
Vanchit Bahujan Aghadi: वंचितमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार; सोलापुरसाठी वंचितकडून सात जण इच्छुक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com