फडणविसांना का पाठिंबा दिला, याचे गुपित संजय शिंदेंनी फोडले...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार संजय शिंदे बोलत होते.
MLA Sanjay Shinde
MLA Sanjay Shindesarkarnama
Published on
Updated on

करमाळा : लोकसभेची निवडणूक मी पवार साहेबांच्या शब्दावर राष्ट्रवादीकडून (NCP) लढविली. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी वेगळी परिस्थिती होती. मला कोणाचा ना कोणाचा पाठिंबा घेणे गरजेचे होते. त्यामुळे मी पवारसाहेबांना, अजितदादांना सांगितले. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढलो, असे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) यांना सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिसंवाद यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार दीपक साळुंखे, बारामती अॅग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, आप्पासाहेब झांजुर्णे, तानाजी झोळ, चंद्रकांत सरडे, नलिनी जाधव, अॅड. सविता शिंदे उपस्थित होते.

MLA Sanjay Shinde
आमदार संजयमामा तुम्ही अपक्ष म्हणत बसु नका; आता थेट राष्ट्रवादीत या! 

करमाळा येथे आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे म्हणाले, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बळीराम साठे यांना दिलेला शब्द पाळण्यासाठीच मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंब्याचे पत्र दिले होते. मी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता किंवा भाजपला पाठिंबा दिलेला नव्हता. माझी स्पष्ट अठ होती की फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तरच माझा तुम्हाला पाठिंबा आहे. तशा प्रकारचे पत्र मी त्यांना दिले होते, असा गोप्यस्फोट शिंदे यांनी यावेळी केला.

या कार्यक्रमात बोलताना जंयत पाटील म्हणाले, करमाळा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे तुम्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आमदार झालेला आहात. आता तुम्ही अपक्ष फि पक्ष काही म्हणत बसू नका, संजयमामा तुम्ही थेट राष्ट्रवादीत या! असे आवाहन केले. शिंदे यांनी आत्तापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही कामाला आम्ही नकार दिलेला नाही. शिंदे यांनी आता कुठलाही विचार न करता राष्ट्रवादी पक्षाचा विचार करून जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठीप्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही पाटील म्हणाले.

MLA Sanjay Shinde
नवा-जुना बघणार नाही; निवडून येणाऱ्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी

सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे यांनी राष्ट्रवादीला ठामपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आता मागे वळून न बघता सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे म्हणून भविष्यात विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहतील ते सर्वच्या सर्व निवडून कसे येतील यासाठी प्रयत्न करावा. राष्ट्रवादीला आमदार संजयमामा शिंदे यांच्यासारख्या नेतृत्वाने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com