Muzmil Kazi, Sandip Burkul, Sharad Pawar
Muzmil Kazi, Sandip Burkul, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar And Solapur : मंगळवेढ्यातील 'या' दोन युवा नेत्यांना शरद पवारांचं बळ; तालुक्यात चर्चेला उधाण

NCP Politics After Crisis : राज्यभर पवार उभी करणार नवी फौज

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पक्षातील अनेक शिलेदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात जाणे पसंत केले. तर दुसरीकडे आमदार-पदाधिकारी गेले तरी कार्यकर्त्यांनी मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ दिली आहे. पक्षातील दुहीनंतर पुढील निवडणुकांसाठी शरद पवारांनी राज्यभर आपली फौज उभी करत आहेत. यासाठी राज्यभरातील आपल्या गटाची राज्यभर चाचपणी सुरू केलेली आहे. (Latest Political News)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर असताना पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत उमेदवारांबाबत चाचपणी केल्याचे बोलले जात आहे. याचवेळी मंगळवेढ्यात राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुजमिल काझी व शहर युवकचे अध्यक्ष संदीप बुरकुल यांनी आपल्या कार्याचा अहवाल शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. आपण केलेल्या कामाची माहिती खुद्द पवारांच्या हातात गेल्यामुळे हे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मंगळवेढ्यातील या दोन युवक पदाधिकाऱ्यांच्या ताकदीचा अंदाज घेऊन पवारांनी त्यांना बळ देण्याचे संकेत दिले.

Muzmil Kazi, Sandip Burkul, Sharad Pawar
Sharad Pawar On Age : वय काढणाऱ्या पत्रकाराला पवार म्हणाले, माझ्याशी कुस्ती खेळता का ?

शहराध्यक्ष मुझ्झमील काझी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीवर आंदोलन केले. कर्नाटकने सोलापूर जिल्हा कर्नाटकला जोडण्याच्या मागणीवर आंदोलन केले. पंढरपूर विजयपूर या रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंकडे पाठपुरावा केला. खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. प्रधानमंत्री फसल बीमा योजना सूर्यफूलाचा समावेशासाठी पाठपुरावा केला. लेखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ, आरक्षणासाठी पोस्ट कार्ड आंदोलन केले. गरोदर महिलांना महात्मा फुले जन आरोग्यातून उपचार सुविधा पुन्हा उपचार सुरू करण्याची मागणी लावून धरली, आदी कामे करून राष्ट्रवादी लोकांमध्ये रुजवण्याचे काम केल्याचा दावा काझींनी आपल्या अहवालात केला आहे.

Muzmil Kazi, Sandip Burkul, Sharad Pawar
NCP Political News : मोठी घडामोड! राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना भूमिका मांडण्यासाठी निवडणूक आयोगाचा ७२ तासांचा अल्टिमेटम

राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संदीप बुरकुल यांनी पदवीधरांचा मेळावा, केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध निषेध आंदोलन केले. कोरोना काळात विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची मागणी, अनाथ व गरजू मुलांना मदत केली. आरक्षणासाठी पोस्ट कार्यालयासमोर आंदोलन केले. महिला कर्मचाऱ्यांचा सन्मानासारखे कार्यक्रम राबवून राष्ट्रवादीची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पी.बी. पाटील यांचे दोन महिन्यापूर्वी अपघाती निधन झाले. त्या जागेवर अद्याप नवीन नियुक्ती केलेली नाही. तर अजित पवारांनी भाजपशी जवळीक साधल्यामुळे मंगळवेढ्यातील निवडक पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची साथ सोडली. अभिजीत पाटीलांना संभाव्य उमेदवार मानले जात आहे ,परंतु त्यांची राजकीय मोळी मजबूत करण्याच्या प्रयत्नात 2024 चा विधानसभेचा आमदार किंवा जागा भाजपकडून हिसकावण्याच्या दृष्टीने तालुक्यामध्ये नव्या तालुकाध्यक्षासह काही कार्यक्षम पदाधिकारी निवडणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने या दोन शहराध्यक्षांनी दिलेल्या अहवालाचे किंवा त्यांच्या कामाची शरद पवार दखल घेणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com