Solapur News : सोलापूरचे पालकमंत्री लिहिणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; कारण काय?

Jaykumar Gore Statement : एल निनोमुळे पाणीटंचाईची शक्यता असतानाही आषाढी वारीतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 28 June : एल निनोमुळे यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यावर निर्बंध आहेत, तरीही आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आषाढीवारी दरम्यान भीमा नदी पाणी सोडावे, असे लेखी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन विनंती करणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपुरात दिली.

चंद्रभागा नदीत पाणी नसल्यामुळे भाविकांची स्नानाची गैरसोय होत आहे. आषाढी वारीसाठी विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघू लागल्या आहेत. आतापासूनच वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. चंद्रभागेत स्नानासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचे सांगितले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती जतन आणि संवर्धनाच्या कामाचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाने जतन आणि संवर्धनाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी आम्ही विनंती करणार आहोत. आषाढीपूर्वी परवानगी मिळाली तर ठीक; अन्यथा आषाढीनंतर आम्ही मूर्तीजतन आणि संवर्धनाचे काम सुरू करू, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झिज झाल्याने लवकरात लवकर मूर्तीवर लेपन प्रक्रिया करावी, असा सल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाने मंदिर समितीला दिला आहे. त्यानुसार मंदिर समितीने लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि राष्ट्रीय मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनी मूर्तीवर लेपन प्रक्रियेऐवजी आयुर्वेदिक वज्रलेप करावा अशी याचिका येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्यास अंतिम स्थगिती दिली आहे.

Devendra Fadnavis
Omraje Nimbalkar : ओमराजेंनी उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? संजय राऊतांनी यादीच वाचली...

यावर मंदिर समितीने या विरोधात वरिष्ठ जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मूर्ती जतन संवर्धन कामाबाबत पत्रकार परिषदेत भाष्य केले

Devendra Fadnavis
Shivsena UBT : मातोश्रीची साथ सोडणाऱ्या शिवसेना खासदाराचा मोठा गौप्यस्फोट : संजय राऊत अन्‌ उद्धव ठाकरेंचेच पटत नाही...

विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे जतन आणि संवर्धन लवकरच हाती घेणार

पालकमंत्री गोरे म्हणाले, विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया न करता पारंपारिक पद्धतीने जतन आणि संवर्धन केले जावे, अशी मागणी वारकरी संप्रदायातील काही मंडळींनी केली आहे. या विरोधात त्यांनी न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयाने रासायनिक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. मात्र मूर्ती जतन आणि संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे. यात स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर हाती घेतली जाईल, असेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com