Somnath Vaidya : दक्षिण सोलापुरातून मंत्रालय प्रशासनातील अनुभवी माणूस रिंगणात; सोमनाथ वैद्य यांची निवडणुकीपूर्वी जोरदार चर्चा

Somnath Vaidya Vidhan Sabha Election : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात नवीन चेहरा प्रशासनात जुना म्हणून अनुभव असलेले सोमनाथ वैद्य यांची जोरदार चर्चा रंगली आहे.
Somnath Vaidya
Somnath VaidyaSarkarnama
Published on
Updated on

Solapur Vidhan Sabha Election : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात नवीन चेहरा प्रशासनात जुना म्हणून अनुभव असलेले सोमनाथ वैद्य यांची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपासून त्यांनी या भागात सामाजिक कार्याचा झपाटा लावला आहे. मंत्रालयात कामकाजाला असल्याने प्रशासनातील अनुभवी म्हणून त्यांची ख्याती असून त्यामुळे जनतेची कामे कशी करून घ्यायची यात त्यांचा हातखंडा आहे.

लिंगायत समाजातील सुशिक्षित आणि प्रशासनातील जाणकार उमेदवार म्हणून ते चमत्कार करतील का? याकडे आता लक्ष लागले आहे. सोमनाथ वैदय यांना स्थानिक अनेक जेष्ठ राजकारणी मंडळी व लिंगायत समाजाचे जगद्गुरू यांचा व मठाधीपती यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्या आहेत.

गेल्या 19 वर्षांपासून मंत्रालय विधानभवन प्रशासकीय पातळीवर सतत लोकांचा संपर्क ठेवून सोमनाथ वैद्य (Somnath Vaidya) यांनी अनेक गरजूंना सढळ हाताने स्वयंम शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे. सोमनाथ वैद्य हे गेल्या १९ वर्षांपासून मंत्रालय विधानभवनात स्वीय सहायक म्हणून काम करीत असून त्यांना प्रशासकीय कामाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. सरकारी कामे कशी उत्तमपणे व जलदगतीने करून घ्यायची, याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे.

राष्ट्रवादीचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे (Manohar Dongare) यांच्याबरोबर साखरकारखाना कामाबाबत ७-८ वेळा तर राजन पाटील व बाळराजेसोबत ते ९-१० वेळा त्यांनी दिल्ली दौरा केला असून त्यांनी देशांतर्गतसह परदेश अभ्यास दौरे केले असून दावोस, लंडन, पॅरिस, रोम इटली, दुबई, चीन तसेच अन्य युरोपिय देशांचा दौरा करून त्यांनी नवनवीन गोष्टी कौशल्य अवगत केल्या आहेत. गेल्या १० वर्षांत स्वतःच्या जन्मगावी शासन निधीच्या माध्यमातून त्यांनी गावाचा विकास घडवून आणला. याची दखल घेऊन गावकऱ्यांनी त्यांच्या वडिलांना बिनविरोध सरपंच केले आहे. कायद्याचे शिक्षण पूर्ण करीत असताना सोमनाथ यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वीय सहायक म्हूणन २००६ ते २००९ दरम्यान काम पाहिले.

Somnath Vaidya
Vidhan Sabha Election : शिवसेना-भाजपची पहिल्यांदाच युती, काँग्रेस पुन्हा सत्तेत!

राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री यांचे मंत्रालयांन आस्थापनेवर स्वीय सहायक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम केले आहे. या काळात त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक समाजोपयोगी कामे केली. आता दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघात ते भावी उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत. लिंगायत समाजातील सशक्त व उच्चशिक्षित उमेदवार, प्रशासकीय कामाची जाण अशा विविध गुणांमुळे त्यांना हा विधानसभेचा मार्ग सुकर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. महात्मा बसवेश्वर यांच्या सर्वधर्मसमभाव या धोरणावर तसेच आमच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तसेच आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी सोलापूरचे समाजकारण अतिशय चांगल्या प्रकारे करतात हाच आदर्श गुण घेऊन सोमेश पुढे मतदारसंघांचे समाजकारण आणि राजकारण करणार आहेत असे ते आवर्जून सांगतात.

सोमेश यांनी सन २०११-१२ साली आताच्या खासदार व तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांचा PA होण्यासाठी जनवात्सल्य बंगल्यावर जाऊन interview दिला होता असे सोमेश आवर्जून सांगतात. सोलापूर शहरातील श्रमिक पत्रकार यांच्या १९५ पाल्यांना सोमेश वैद्य यांच्या फौंडेशन मार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती आदरणीय धर्मराज काडादी साहेब, राकेश टोळे साहेब व इतर संपादक यांच्या उपस्तिथीमध्ये देण्यात आली आहे.

आमदार झाल्यावर काय करणार ? काय म्हणतात सोमनाथ वैद्य?

तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवणार!

दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ १० टक्के शेती सिंचनाखाली आहे. त्यामुळे तालुक्याचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तालुक्यात सौना- भीमा अशा दोन नद्या आहेत मात्र त्याचा लाभ ठराविक भागालाच झाला आहे. तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आपण मोठे नियोजन केले आहे .तालुक्यातील प्रत्येक शेतीला पाणी मिळावे यासाठी आपण सीना भीमा उपसा सिंचन योजना राबविण्यात येईल. तालुक्यातील कालवे दुरुस्त करून जिथे कालवे नाहीत तिथे कालवे निर्माण करून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मंद्रूपला एमआयडीसी उभारू !

मंद्रूपला यापूर्वी एमआयडीसी मंजूर होती, मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे शेतकरी आंदोलन झाले. परिणामी, शासनाला मंद्रूपची एमआयडीसी रद्द करावी लागली. मंद्रूप भागातील बेरोजगारी कमी होण्यासाठी या भागातील दळणवळण व आर्थिक उलाढाल वाढण्यासाठी मंद्रूपला नव्याने एमआयडीसी (MIDC) मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनेच मंद्रूपला एमआयडीसी उभारू.

Somnath Vaidya
Rajya Sabha by Election : राज्यसभा निवडणुकीत एनडीए की इंडिया, कुणाचं पारडं जड? असं आहे विजयाचं गणित...

वडापूर धरणासाठी पाठपुरावा करू..!

गेल्या वीस वर्षापासून वडापूर येथे धरण व्हावे अशी मागणी आहे. मात्र याकडे शासनाने गांभीयनि लक्ष दिले नाही. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा आणि मोहोळ पाच तालुक्याला वडापूर धरणाचा मोठा लाभ होणार आहे. या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे. वडापूर येथे धरण व्हावेत अथवा ब्रिज कम चैरैज व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे.

मागेल त्याला डीपी देणार !

सध्या शेतशिवारात वीजेचे डीपी जळण्याचे प्रमाण मोठे आहे. शेतकऱ्यांना विजेचे डीपी वारंवार मागणी करूनही मिळत नाही. त्यामुळे वीजे अभावी पिकांना पाणी देता येत नाही, त्यामुळे पिके करपून जातात, शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. आपण तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यावर मागेल त्याला वीजेचे डी पी देण्यात येईल आणि संपूर्ण मतदारसंघात आणि नदीकाठच्या शेतकर्‍यांनाही चोवीस तास वीज उपलब्ध करून देण्याचा आपला संकल्प आहे.

गाव, शिवार, शहर रस्त्याने जोडू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावे, शिवार, शहर रस्त्याने जोडण्याचा आपला संकल्प आहे. रस्ते मजबूत असेल तर दळणवळण वेगाने होते त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढून मतदारसंघाचा विकास वेगाने होतो. त्यामुळे संपूर्ण सोलापूर विधानसभा मतदारसंघ रस्त्याचे जाळे निर्माण करून मतदारसंघाचा विकास करणार आहोत.

मतदारसंघातील मंदिर, मस्जिदचा विकास करणार

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक मंदिर व मस्जिद हे ऐतिहासिक आहेत. या मंदिर व मस्जिदचा परिसर विकसित करण्यासाठी आपण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्याचा आपला संकल्प आहे.

Somnath Vaidya
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरात काँग्रेस इलेक्शन मोडवर! विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज करण्याच्या सूचना

शहरातील मूलभूत प्रश्न सोडविणार

सोलापूर शहरातील सैफुल, जुळे सोलापूर, नेहरूनगर, आसरा, निलमनगर, नई जिंदगी, विमानतळ, हतुरे वस्ती, सोरेगाव, एमआयडीसी यासह मतदारसंघातील अनेक भागात आजही वीज, रस्ते, पाणी, आरोग्य आणि शैक्षणिक प्रश्न भेडसावत आहेत. आपण लोकप्रतिनिधी झाल्यावर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व शहरी भागात वीज रस्ते पाणी आरोग्य मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

मंद्रूपला शैक्षणिक हब निर्माण करू

मंद्रूप हे तालुकास्तरीय गाव आहे आपल्या तालुक्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूरला जावे लागते सध्या येथे बीए बी कॉम आणि बीएससी चे शिक्षण होते इंजीनियरिंग, अभियांत्रिकी, तसेच त्यांनी एम. ए. एम. कॉम, एम. एस. सी है शैक्षणिक संकुल निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे. मंद्रूप येथील औद्योगिक शैक्षणिक संस्थेत मोजकेच अभ्यासक्रम असून येथे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्याचा आपला संकल्प आहे.वैदय हे थेट जनतेपर्यंत पोहचत असून सामाजिक उपक्रम व गाठी भेठी करून संवाद साधात आहेत. हा नवीन प्रशासकीय कामात तरबेज असलेला चेहराला मतदार किती स्वीकारतील याबाबत उत्सुकता आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com