त्या प्रकरणी साईबाबा संस्थानच्या विश्वस्ताने मानली दिलगिरी

शिर्डी येथील साईबाबा संस्थान हे देशात प्रसिद्ध आहे.
shirdi
shirdi Sarkarnama

अहमदनगर - शिर्डी येथील साईबाबा संस्थान हे देशात प्रसिद्ध आहे. या देवस्थानमध्ये भाग्यश्री बानायत या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्यावर संस्थानच्या एका विश्वस्ताने आरोप केले. या प्रकाराची जिल्हाभर चर्चा होत असतानाच त्या विश्वस्ताने दिलगिरी व्यक्त केली आहे. या प्रकारावर बानायत यांनी आपले मत मांडले. ( The trustee of Saibaba Sansthan apologizes to the CEO )

शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर यांनी केला होता. बानायत या अनेक महत्वाचे निर्णय विश्वस्तांना अंधार ठेऊन घेतले जातात असा आरोप गुजर यांनी केला होता.

shirdi
शिर्डी विमानतळाला ग्रामपंचायत लावणार कुलूप

त्यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देतांना मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या, साई संस्थानमध्ये निर्णय घेतले जातात. त्याला सबळ पुरावे असतात. विश्वस्तांना असे काही बोलायचं असेल तर त्यांनी बैठकी सारख्या माध्यमातून त्यांना मत व्यक्त करता येऊ शकतात आणि आता त्या प्रकरणावर पडदा पडला आहे. त्यांनी मला मेसेज पाठवून दिलगिरी व्यक्त केली असल्याचे बानायत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com