उदयनराजेंची कोंडी : राज्यपालांचे निषेध करणारे ते व्टविट केले डिलिट...

राज्यपाल Governer भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी समर्थ रामदास स्वामी Ramdas Swami यांच्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केल होते. यावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
MP Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
MP Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyarisarkarnama

सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते हे वक्तव्य करून महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, अशा आशयाचे व्टविट खासदार उदयनराजे भोसले यांच्या व्टविटर अकौंटवरून डिलिट करण्यात आले आहे. हे व्टविट का डिलिट केले याची राजकिय वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केल होते. यावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले होते. या वादग्रस्त विधानावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. खासदार उदयनराजे यांनी ट्विटव्दारे राज्यपालांवर निशाणा साधला होता.

Deleted Twit
Deleted TwitSarkarnama

यासंदर्भात उदयनराजेंच्या व्टविटर अकौंटवरून पहिले व्टविट करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते हे वक्तव्य करून महाराजांचा अपमानच केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, अशा आशयाचे व्टविट होते. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्या व्टविटर अकौंटवरून ते डिलिट करण्यात आले आहे. हे व्टविट का डिलिट केले याची राजकिय वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे.

MP Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
उदयनराजे संतप्त : राज्यपालांनी ते वक्तव्य मागे घ्यावे

त्याऐवजी आता दुसरे व्टविट करण्यात आले आहे. यामध्ये उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय की, 'राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या, तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे. तरीही औरंगाबादमधील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांचा संदर्भ देवून एकप्रकारे महाराजांचा अपमानच केलाय.' त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. खरं तर राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं. 'त्यांच्या वक्तव्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, तरी राज्यपाल कोश्यारी यांनी आपलं वक्तव्य त्वरित मागं घ्यावं,' असे आवाहन वजा इशारा उदयनराजेंनी राज्यपालांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com